24 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमंत्रालयमंत्री अतुल सावेंच्या विभागाची कामगिरी न्यारी! कोट्यवधीच्या योजनांचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ

मंत्री अतुल सावेंच्या विभागाची कामगिरी न्यारी! कोट्यवधीच्या योजनांचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ

सरकारी काम सहा महिने थांब’ असे आपल्याकडे सर्रास बोलले जाते. पण काही अधिकारी, मंत्री हे त्या त्या विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवतात. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल मोरेश्वर सावे हे त्यापैकी एक. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांची बेताची आर्थिक परिस्थिती, पालकांकडे स्थावर जंगम मालमत्ता नाही, बाजारात पत नसल्याने बँका त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी कर्ज द्यायला नकार देतात. पण अशा समाजातील अनेक मुले हुशार असतात. फक्त संधीच्या अभावाने त्यांना त्यांचे शिक्षण घेत येत नव्हते. पण या विभागाने समाजातील खालच्या, उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी विविध योजना तयार केलेल्या आहेत.

अतुल मोरेश्वर सावे यांनी मंत्री म्हणून या विभागाचा कार्यभार सांभाळल्यानंतर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी १८५ कोटी ४८ लाख आणि मॅट्रिकोतर शिष्यवृत्तीसाठी ६७५६ कोटी ६ लाख खर्च करण्यात आले आहेत. तर परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्यासाठी शिष्यवृत्तीपोटी सरकारने २५ कोटीहून जास्त खर्च केला आहे. आज यातील बरीच मुले सरकारी, खासगी आणि अन्य आस्थापनामध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत.

अतुल सावे यांनी या विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर समाजातील उपेक्षित घटकातील विद्यार्थाना सरकारी योजनांचा लाभ मिळावा, पात्र विद्यार्थी या योजनांपासून वंचित राहू नये म्हणून डोळ्यात तेल घालून काळजी घेतली, घेत आहेत. त्यामुळे दरवर्षी या विभागाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ 50 विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ 15 लाख विद्यार्थ्यांना मिळालेला आहे.

राज्यातील विभाजक, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत 10 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती 11.10. 2018 च्या शासन निर्णयान्वये देण्यात येते. 11. 10. 2022 च्या शासन निर्णयान्वये या योजने अंतर्गत विद्यार्थी संख्येत 10 शिवाय 50 इतकी वाढ केनयात आली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लाभामध्ये शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण शुल्क फी, आरोग्य विमा, निर्वाह भत्ता व विमान प्रवास आदी बाबी अदा करण्यात येतात.

अतुल सावे हे या विभागाचे मंत्री झाल्यावर समाजातील गरीब, उपेक्षित घटकांना न्याय मिळू लागला आहे. सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी १ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी विमान तिकिटासह एका विद्यार्थ्यामागे जो खर्च येईल तो विभागाकडून करण्यात येतो. परदेशी शिष्यवृत्तीसाठी 2020-21 या वर्षासाठी 3 कोटीची रक्कम मंजूर करण्यात आली. त्यातील 3 कोटी वितरित करण्यात आले. 2021-22 मध्ये 10 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला. 6 कोटी 71 लाख वितरित करण्यात आले. तर 2022-23 मध्ये 50 विद्यार्थ्यांना 23 कोटी 48 लाख वितरित करण्यात आले.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी 2020-21 या वर्षासाठी 3 कोटीची रक्कम मंजूर करण्यात आली. त्यातील 3 कोटी वितरित करण्यात आले. 2021-22 मध्ये 10 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला. 6 कोटी 71 लाख वितरित करण्यात आले. तर 2022-23 मध्ये 50 विद्यार्थ्यांना 23 कोटी 48 लाख वितरित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा 

जरांगेंचे राजकीय बॉस शरद पवार, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप

अजितदादा… २४ तास ऑन ड्युटी

मराठ्यांना अंगावर घेऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा

विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीअंतर्गत एकूण ९ योजना तसेच मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती करीता ९ योजना अशा एकूण १८ योजना राबविल्या जातात. या शिष्यवृत्ती योजनेचा आतापर्यंत 15 लाख विद्यार्थ्यांना मिळालेला आहे.

या योजनेत 3 वर्षात वितरित केलेले निधी व झालेला खर्च याचा तपशील पुढीलप्रमाणे- मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत २०२०-२१ मध्ये ५९ कोटी ७० लाख एकूण तरतूद होती. त्यापैकी ३१ कोटी ६९ लाख खर्च करण्यात आले. २०२१-२२ मध्ये ६५ कोटी ३९ लाख (तरतूद), ३३ कोटी ४४ लाख खर्च, २०२२-२३मध्ये १५४ कोटी १८ लाख (तरतूद), १२० कोटी ३५ लाख खर्च.

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनामध्ये २०२०-२१ मध्ये १७९२ कोटी १४ लाख (तरतूद), १२४१ कोटी खर्च, २०२१-२२ मध्ये २९६९ कोटी (तरतूद), २६८७ कोटी ३१ लाख खर्च तर २०२२-२३ मध्ये २९०३ कोटी ८० लाख (तरतूद), २८२८ कोटी 15 लाख खर्च करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी