33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रिकेटभारताचे हे स्टार खेळाडू वर्ल्डकपनंतर निवृत्त होणार?

भारताचे हे स्टार खेळाडू वर्ल्डकपनंतर निवृत्त होणार?

क्षेत्र कोणतंही असो त्या ठिकाणी माणसाला कधी ना कधी थांबाव लागतं. आता भारतीय क्रिकेट संघातुन काही खेळाडु निवृत्त होण्याच्या वाटेवर आहेत. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकानंतर भारतातील काही खेळाडु निवृत्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यापैकी काही नावे आता पुढं आली आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा निवृत्त होण्याच्या चर्चाना उधाण आलंय. त्यानंतर भारताचा खेळाडु विराट कोहली याचं देखील नाव पुढं येत आहे. सध्या रोहीत शर्माचं वय 36 वर्षे असून पुढील विश्वचषकापर्यंत त्याचे वय हे 40 होईल. तर विराट कोहलीचं वय देखील 34 आहे. पुढच्या विश्वचषकापर्यंत कोहलीचं वय हे 39 असू शकते. यामुळे भारतातील या दोन्ही खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. विराट कोहली आणि रोहीत शर्मा या  दोघांच्या कामगिरीबाबत विचार केल्यास दोघांची कामगिरी जागतिक स्तरावर उल्लेखनिय समजली जाते.

रोहीत शर्मा आणि विराट कोहलीची वनडे कारकीर्दीतील खेळी   

रोहीतने 251 वनडे सामन्यात 10 हजारापार धावा केल्या अहेत. त्याने 30 शतकं आणि 52 अर्धशतक केले आहेत. तर रन मशिन विराटने 266 वनडे सामने खेळून 64 वेळा 50 धावा केल्या आहेत. तर 47 शतकं कोहलीने झळकावली आहेत. या दोघांचा खेळ पाहता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेदेखील त्याचा शंभर शतकांचा रेकाॅर्ड कोहली आणि रोहीत तोडू शकतात. असे एकदा बोलून दाखवले होते.

मोहम्मद शमी

भारतातील अप्रतिम गोलंदाज मोहम्मद शमी देखील या वर्ल्डकपनंतर निवृत्त होऊ शकतो.शामी सध्या 32 वर्षांचा आहे. येणार विश्वचषक हा 2027 मध्ये खेळला जाईल अशावेळी त्याचे वय 36 असेल. वेगवान गोलंदाजाला सतत दुखपतींचा सामना करावा लागत असल्यामुळे सध्या सुरू असलेला वर्ल्ड कप हा शेवटचा असण्याची दाट शक्यता आहे.

हे ही वाचा 

‘ड्रीम11’ला 40 हजार कोटींचा करचुकवल्याची नोटीस? कंपनीची थेट उच्च न्यायालयात धाव

IND vs PAK, Asia Cup 2023: विराट कोहलीची विराट शतकी खेळी; सर्वाधिक वेगाने 13 हजार धावांचा विक्रम

Cricket World Cup 2023 थरार रंगणार; टीम इंडियासह इतर देशांच्या संघांची गेल्या चार वर्षांतील कामगिरी कशी होती ?

आर. आश्विन

त्याचप्रमाणे भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन देखील कदाचित या विश्वचषकानंतर दिसू शकणार नाही. कारण सध्या अश्विनचे वय हे 36 असून येत्या विश्वचषकात त्याचे वय हे 40 असेल. याआधी 2011 मधील वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघात देखील अश्विनचा समावेश होता. आता, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अश्विन कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

भुवनेश्वर कुमार

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा सध्या 33 वर्षांचा आहे. यंदाच्या वर्ल्ड कप संघाचा जारी तो भाग नसला तरी भारताचा एक प्रमुख गोलंदाज म्हणुन त्याला ओळखले जाते. आगामी विश्वचषकात तो 37 वर्षाचा असेल. फिटनेस हा भुवनेश्वरचा सततचा चिंतेचा विषय असल्याने तो पुढील वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी