28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रिकेटCricket World Cup 2023 थरार रंगणार; टीम इंडियासह इतर देशांच्या संघांची गेल्या...

Cricket World Cup 2023 थरार रंगणार; टीम इंडियासह इतर देशांच्या संघांची गेल्या चार वर्षांतील कामगिरी कशी होती ?

क्रिकेटच्या महासंग्रामाला म्हणजेच ODI वर्ल्डकपला आता अवघे काहीच दिवस बाही राहिले आहेत. 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतासह इतर देशांचे संघही कसून तयारी करत आहेत. दर 4 वर्षांनी येणाऱ्या या क्रिकेटच्या महोत्सवासाठी जगभरातील क्रिकेट चाहते देखील उत्सुक असून आपल्या देशाच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी अनेक परदेशी क्रिकेट चाहत्यांनी भारतात यायला सुरुवात केली आहे. पुढे महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेआधीच वातावरण क्रिकेटमय झाले असून वर्ल्ड कप सुरू झाल्यानंतर त्यात आणखी भर पडणार आहे.

भारतीय संघ ह्या स्पर्धेसाठी तयार असून नुकत्याच झालेल्या आशिया चषकात विजेतेपद मिळवून भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप साठी सज्ज असल्याचे दाखविले आहे. त्यासोबतच, बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत होत असलेल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून येणाऱ्या प्रत्येक चॅलेंजसाठी तयार असल्याची ग्वाही दिली आहे. या मालिका विजयाने भारताने एकदिवसीय रॅंकिंगमध्ये पाहिला क्रमांक मिळवला आहे. भारतीय खेळाडूही जबरदस्त फॉर्ममध्ये असून संघातील वातावरण सकारात्मक असल्याचे दिसत आहे.


परंतु, भारताबरोबरच इतर सहभागी देशांचे संघही जबरदस्त फॉर्ममध्ये असून भारतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. क्रिकेटविश्वात बलाढ्य मानल्या जाणाऱ्या SENA संघांचे म्हणजेच, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे कठोर आव्हान भारतासमोर असणार आहे. याशिवाय, भारतीय परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी बलाढ्य आशियाई संघ म्हणजेच पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे देखील भारतासमोर तगडे आव्हान उभे करणार आहेत.

भारतासह इतर संघांचा कसं असेल परफॉर्मेंस?

वर्ल्ड कप साठी भारतासह इतर बलाढ्य संघ मैदानात उतरणार आहेत. कागदावर अनेक संघ मजबूत दिसत असले तरीही प्रत्येक संघाचे काही बलस्थान आहेत तर काही त्रुटि देखील आहेत. 2019 वर्ल्ड कप पासून आतापर्यंत सगळ्या संघांचे एकदिवसीय सामन्यांचे प्रदर्शन पाहता 2023 वर्ल्ड कपच्या जेतेपदासाठी चांगलीच चुरस रंगणार आहे.


2019 वर्ल्ड कप नंतरचे सर्व संघाचे प्रदर्शन

भारत

भारतीय क्रिकेट संघाने 2019 वर्ल्ड कप नंतर सर्वाधिक 65 वन डे मॅच खेळल्या असून भारताची जिंकण्याची टक्केवारी 61.56% आहे. होम ग्राउंड वर भारताने मागील चार वर्षात 26 वन डे खेळल्या असून त्यापैकी 20 सामने जिंकले आहेत. या चार वर्षात भारताकडून शुभमन गिल ने सर्वाधिक धावा केल्या असून त्याने 33 सामन्यात 1901 धावा केल्या आहेत. याबाबत, विराट कोहली दुसऱ्या नंबरवर असून त्याने 1741 धावा केल्या आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 57 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामागोमाग, मोहम्मद सिराजने 53 विकेट्स पटकावल्या आहेत.

पाकिस्तान

पाकिस्तान क्रिकेट संघाने 2019 वर्ल्ड कप नंतर 36 वन डे खेळल्या असून त्यापैकी 24 सामने जिंकले असून केवळ 10 सामने हरले आहेत. त्यांची जिंकण्याची टक्केवारी सर्वाधिक 66.67% आहे . पाकिस्तानने मागील 11 वर्षांपासून भारतात एकही सामना खेळलेला नाही. परंतु, आशियाई परिस्थितीत त्यांना खेळण्याचा चांगला अनुभव आहे. आशियाई परिस्थितीत मागील 4 वर्षात त्यांनी 27 मॅच खेळल्या असून त्यापैकी 19 सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. तर 6 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे, पाकिस्तानकडून बाबर आजमने 26 सामन्यात सर्वाधिक 2196 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये हारिस रौफने 26 सामन्यात सर्वाधिक 53 विकेट्स घेतल्या आहेत.


ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने 2019 वर्ल्ड कप नंतर 43 वन डे मॅच खेळल्या असून 23 सामने जिंकले आहेत तर 20 सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाची जिंकण्याची टक्केवारी 53.48% आहे. भारतात मागील चार वर्षात ऑस्ट्रेलियाने 8 वन डे खेळल्या असून त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. या चार वर्षात ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर ने सर्वाधिक धावा केल्या असून त्याने 33 सामन्यात 1298 धावा केल्या आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत अॅडम झंपा ने 37 सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतल्या आहेत.

साऊथ आफ्रिका

साऊथ आफ्रिका क्रिकेट संघाने 2019 वर्ल्ड कप नंतर 40 वन डे मॅच खेळल्या असून त्यांनी 21 सामने जिंकले आहेत. साऊथ आफ्रिकाची जिंकण्याची टक्केवारी 52.5% आहे. भारतात मागील चार वर्षात साऊथ आफ्रिकाने 3 वन डे खेळल्या असून त्यापैकी 1 सामना जिंकला आहे. या चार वर्षात साऊथ आफ्रिकाकडून क्विंटन डिकॉक ने सर्वाधिक धावा केल्या असून त्याने 30 सामन्यात 1269 धावा केल्या आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत तबरेज शमसी ने 29 सामन्यांमध्ये 44 विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंड

इंग्लंड हा 2019 वर्ल्ड कप चा विजेता असून पुन्हा एकदा कप जिंकण्यासाठी ते मैदानात उतरतील. इंग्लंड क्रिकेट संघाने 2019 वर्ल्ड कप नंतर 42 वन डे मॅच खेळल्या असून 22 सामने जिंकले आहेत. इंग्लंडची जिंकण्याची टक्केवारी 52.38% आहे. भारतात मागील चार वर्षात इंग्लंडने 3 वन डे खेळल्या असून त्यापैकी 1 सामना जिंकला आहे. या चार वर्षात इंग्लंडकडून डेव्हिड मलान ने सर्वाधिक धावा केल्या असून त्याने 20 सामन्यात 1022 धावा केल्या आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत आदिल रशीदने 27 सामन्यांमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंड

न्यूझीलंड क्रिकेट संघाने 2019 वर्ल्ड कप नंतर 43 वन डे मॅच खेळल्या असून 24 सामने जिंकले आहेत तर 16 सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली आहे. न्यूझीलंडची जिंकण्याची टक्केवारी 55.81% आहे. भारतात मागील चार वर्षात न्यूझीलंडने 3 वन डे खेळल्या असून तिन्ही सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली आहे. या चार वर्षात न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने सर्वाधिक धावा केल्या असून त्याने 39 सामन्यात 1247 धावा केल्या आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत मॅट हॅनरीने 23 सामन्यांमध्ये 38 विकेट्स घेतल्या आहेत.

हे ही वाचा 

World Cup ची वरात, पुण्याच्या दारात!

वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज, वनडे सह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल

भारत – ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडेमध्ये शमीचा जलवा, ऑसींसमोर केला नवा विक्रम

बांग्लादेश

बांग्लादेश क्रिकेट संघाने 2019 वर्ल्ड कप नंतर 53 वन डे खेळल्या असून त्यापैकी 29 सामने जिंकले आहेत. त्यांची जिंकण्याची टक्केवारी 54.71% आहे . बांग्लादेशने मागील 17 वर्षांपासून भारतात एकही सामना खेळलेला नाही. परंतु, आशियाई परिस्थितीत त्यांना खेळण्याचा चांगला अनुभव आहे. आशियाई परिस्थितीत मागील 4 वर्षात त्यांनी 35 मॅच खेळल्या असून त्यापैकी 18 सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. बांग्लादेशकडून तमीम इकबालने 42 सामन्यात सर्वाधिक 1486 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये मेहदी हसनने 47 सामन्यात सर्वाधिक 56 विकेट्स घेतल्या आहेत.

श्रीलंका

श्रीलंका क्रिकेट संघाने 2019 वर्ल्ड कप नंतर 56 वन डे मॅच खेळल्या असून 30 सामने जिंकले आहेत. श्रीलंकेची जिंकण्याची टक्केवारी 53.57% आहे. भारतात मागील चार वर्षात श्रीलंकेने 3 वन डे खेळल्या असून तिन्ही सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली आहे. या चार वर्षात श्रीलंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक धावा केल्या असून त्याने 40 सामन्यात 1396 धावा केल्या आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत वाणींदु हसरंगाने 39 सामन्यांमध्ये 58 विकेट्स घेतल्या आहेत.

अफगाणीस्तान

अफगाणीस्तान क्रिकेट संघाने 2019 वर्ल्ड कप नंतर 29 वन डे मॅच खेळल्या असून 14 सामने जिंकले आहेत. अफगाणीस्तानची जिंकण्याची टक्केवारी 48.27% आहे. भारतात मागील चार वर्षात अफगाणीस्तानने वेस्ट इंडिज विरुद्ध 3 वन डे खेळल्या असून तिन्ही सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली आहे. या चार वर्षात अफगाणीस्तानकडून रहमत शाहने सर्वाधिक धावा केल्या असून त्याने 27 सामन्यात 1014 धावा केल्या आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत राशीद खानने 26 सामन्यांमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी