32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रिकेटभारत-पाकिस्तान सामन्यासाठी बॉलिवूडसह पाकिस्तानी पत्रकारांची उपस्थिती

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी बॉलिवूडसह पाकिस्तानी पत्रकारांची उपस्थिती

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना येत्या 14 तारखेला भारतातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी जगभरातून क्रिकेटप्रेमी येणार आहेत. यासह सामन्याचे अपडेट्स मिळवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकार देखील उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी पत्रकारांनी भारतात येण्यासाठी व्हिसासाठी या आधीच अर्ज केला होता. हा अर्ज स्वीकारल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जका अश्रफ भारतात येणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय बॉलिवूडचे दिग्गज कलाकार या सामन्याला उपस्थिती लावणार आहेत.

हा सामना आणखी रंगतदार बनवण्यासाठी सामन्याच्या सुरुवातीला लेझर शो, संगीताचा कार्यक्रम होणार आहे. काही गोल्डन तिकीटधारक हा ऐतिहासिक क्रिकेट सामना पाहण्यासाठी उपस्थित असणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक विरोधी क्रिकेट संघांनी या विश्वचषकात सामन्यात प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. यात भारतीय संघ हा अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान संघाने नेदरलँड आणि श्रीलंकेला पराभूत करून 4 गुण संपादन केले आहेत. भारताचेही 4 गुण झाले आहेत. मात्र पॉईंट टेबल पाहिला तर पाकिस्तानच्या आधी भारताचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान हा तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा 

7 कोटी आले कुठून? छगन भुजबळ यांचा जरांगे पाटलांना सवाल

भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठी रेल्वे विभागाकडून क्रिकेट चाहत्यांना आगळीवेगळी भेट

7 कोटी आले कुठून? छगन भुजबळ यांचा जरांगे पाटलांना सवाल

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख येणार?

या ऐतिहासिक सामन्यासाठी पाकिस्तान बोर्डाचे प्रमुख जका अश्रफ उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 60 पाकिस्तानी पत्रकारांनी व्हिसासाठी अर्ज केला होता. जर आणखी विलंब झाला तर या सामन्याचे कव्हरेज देणे कठीण होईल. म्हणून आता अश्रफ हे सामन्यासाठी आपली उपस्थिती दाखवणार आहेत. सामन्याच्या दिवशी ते सकाळी लवकर येतील. तर यासह बॉलिवूडचे काही स्टार देखील सामन्याला हजेरी लावतील.

गोल्डन तिकीटधारक लावणार हजेरी

या सामन्यासाठी गोल्डन तिकीटधारकांमध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, देशातील सर्वोत्कृष्ट आणि अनुभवी अभिनेते रजनीकांत तसेच क्रिकेटचा देव आणि आयसीसी वर्ल्डकपचा ब्रँड अॅब्सेसिडर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना गोल्डन धारकांची तिकिटे देण्यात आली आहेत. हे देखील सामन्यांचा आनंद लुटणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी