31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रिकेटकिंग कोहलीचा बर्थडे अन् शतकी खेळीची प्रतीक्षा

किंग कोहलीचा बर्थडे अन् शतकी खेळीची प्रतीक्षा

भारतात आयसीसी वनडे वर्ल्डकप अंतिम टप्प्यात आला असून 19 नोव्हेंबरला अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात येथे होणार आहे. या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात नेमका कोणता संघ प्रवेश करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (5 नोव्हेंबर) दिवशी ईडन गार्डन, कोलकत्ता येथे इंडिया विरुद्ध द.आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. याच दिवशी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रन मशीन ‘विराट कोहली’चा वाढदिवस आहे. यामुळे आजचा सामना पाहणे अधिकच उत्कंठावर्धक असून दोन्ही तुल्यबळ सांघातून कोण बाजी मारणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारत पॉइंट्स टेबलने पहिल्या क्रमांकावर आला असला तरीही द.आफ्रिकेत टीम इंडियाचा पराभव करण्याची क्षमता आहे.

टीम इंडियाने सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये 7 सामने खेळले असून 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर द.आफ्रिकेने 7 सामने खेळले असून 6 सामन्यात विजय मिळवला आहे. ईडन गार्डनवर भारत प्रथमच खेळत असून विराट कोहली आपल्या 35 व्या वाढदिवशी सचिनचा रेकॉर्ड मोडीत काढून शतक ठोकणार का? याकडे इंडियाच नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्यात टीम इंडियाचे मध्यम गती गोलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचे 300 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांशी गाठ होणार आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजीचा विचार केल्यास मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रित बुमराह यांनी सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये 38 गडी बाद केले आहेत.

हे ही वाचा

अंबानींना धमकी देणारे आहेत तरी कोण?

ईडन गार्डनवर आज वर्ल्डकपची रंगीत तालीम

रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील रासायनिक कारखाने झाले जीवघेणे

या दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 90 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 50 सामने हे द. आफ्रिकेने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने एकूण 37 सामने जिंकले आहेत. तर इतर 3 सामन्याबाबत निकाल स्पष्ट न झाल्याची माहिती समोर आली. टीम इंडिया आणि द.आफ्रिका यांच्यात वर्ल्डकपचे आतापर्यंत 5 सामने झाले आहेत. यापैकी 3 सामन्यात द. आफ्रिकेने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे भारताने 2 सामन्यात आफ्रिकेचा पराभव केला आहे. आजच्या या दोन्ही संघात कोण बाजी मारणार? तर विराट कोहलीच्या 35 व्या वाढदिवशी विराट आपले शतक पूर्ण करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

विराट कोहलीच्या 442 धावा तर रोहीत शर्माच्या 402 धावा आहेत. के.एल राहुल आणि शुभमन गिल उपयुक्त खेळी करत आहेत.  सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज शुभमन गिल ठरला आहे. मागील झालेल्या सामन्यात त्याने चांगली कामगीरी करत 92 धावांची खेळी केली होती. तर द.आफ्रिकेचा विचार केल्यास यंदाचा शेवटचा वर्ल्डकप क्वींटन डी कॉक खेळणार आहे. द.आफ्रिकेने आतापर्यंत धावा अनेकदा केल्या आहेत. तर एडन मार्कराम 7 डावात 362 धावा केल्या आहेत. तर सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये द.आफ्रिकेने 399 धावा केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी