33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाईडन गार्डनवर आज वर्ल्डकपची रंगीत तालीम

ईडन गार्डनवर आज वर्ल्डकपची रंगीत तालीम

वर्ल्डकपची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर दोन महासंघांचा महामुकाबला होणार आहे. वर्ल्डकपचे दोन प्रमुख दावेदार टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांचे संघ आज एकमेकांना भिडणार आहेत. आता या सामन्यात सलग आठवा विजय मिळवून ‘विजयाष्टमी’ साजरी करणार की टीम इंडियाचा विजयरथ अडवून दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाच्या गुणांशी बरोबरी साधणार, याकडे संपूर्ण भारतीयांचं लक्ष्य लागलं आहे.

विशेष म्हणजे टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडिया विराट कोहलीला वाढदिवसाची खास भेट देणार का, याचीही सर्वांना उत्सुकता आहे. शिवाय मागच्या सामन्यात थोडक्यात चुकलेले शतक पूर्ण करून विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमी ४९ शतकाशी बरोबरी साधणार का, याकडेही क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहेत. यामुळे ईडन गार्डनवरील सामना सर्वार्थाने महत्त्वपूर्ण असणार आहे.

आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत टीम इंडियाने सलग ७ सामने जिंकून १४ गुणांची कमाई केली आहे. तर दक्षिण आफ्रिकेने ७ पैकी ६ सामने जिंकून १२ गूण मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेने एक सामना गमावला आहे. म्हणूनच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बावुमा यांनी व्यूहरचनेवर भर दिला आहे. काहीही झाले तरी सामना जिंकायचाच, असा चंग दोन्ही कर्णधारांनी बांधला आहे.

दोन्ही बाजूंचा विचार केल्यास टीम इंडियाचे मोहम्मद शमी, सिराज कमाल आहेत. जसप्रित बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे गेम चेंजर म्हणून ओळखले जातात. तर दक्षिण आफ्रिकेने क्विंटन, डीकॉक, मार्कराम आणि एडेन यांची कामगिरी झक्कास राहिली आहे. त्यामुळे सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.

कुणाचे पारडे जड?
एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघामध्ये ५ सामने झाले आहेत. त्यातील टीम इंडियाने दोन तर दक्षिण आफ्रिकेने तीन सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ९० सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने ५० सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने ३७ सामन्यात विजय मिळवला आहे. तर तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका प्रथमच आमने-सामने येत आहेत.

हे ही वाचा

किंग कोहलीचा बर्थडे अन् शतकी खेळीची प्रतीक्षा

कुस्ती एक, स्पर्धांची शहरे दोन

तुम्ही आयरा खानचं केळवण पाहिलं का?

ईडन गार्डनवर कस

ईडन गार्डन मैदानातील पीच सुरुवातीला फलंदाजांना आणि नंतर गोलंदाजांना अनुकूल असतो, हा इतिहास आहे. त्यामुळे ६५ हजार क्रिकेटप्रेमींसमोर दोन्ही संघांच्या कस लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी