29 C
Mumbai
Saturday, September 2, 2023
घरमहाराष्ट्रसंरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर काल पोलिसांनी लाठीमार करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून केलेल्या या अमानुष वागणूकीचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रात ठीकठिकाणी आंदोलने करण्यात आली. सरकारने हा जाणूनबूजून केलेला प्रकार असल्याचा आरोप मराठा समाजातून केला जात आहे, अशातच जालन्यातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री गावच्या सरपंचाने स्वत:ची अलिशान कार पेटविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे, मात्र आतापर्यंत कोणत्याच सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात यश आलेले नाही. त्यामुळे मराठा समाज कंमालीचा संतप्त झाला आहे. वारंवार आंदोलने, मोर्चे, उपोषण करुन देखील सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जुरंगे-पाटील उपोषणाला बसले होते. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी काल पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.

आज राज्यात अनेक ठिकाणी शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. अनेक ठिकाणी आंदोलकांकडून खासगी वाहने जाळल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी देखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. गेले कित्तेक वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. मराठा समाजातील गरीबांची स्थिती अत्यंत दयनिय असल्याने मराठा समाजात बेकारीचे प्रमाण वाढले आहे, अशातच शेतीची स्थिती देखील अतिशय वाईट असल्याने मराठा समाज मेटाकूटीला आलेला आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी मराठा समाज करत आहे.

हे सुद्धा वाचा 
जालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद! पहा कुठे काय झालं?
सरंजामी मराठा नेतृत्वाचा आरक्षणाला विरोध असल्याने लाठीचार्ज; वंचितचा आरोप
मराठा आंदोलनकर्ते संतापले; अहमदनगर, सोलापूरसह नंदुरबार जिल्ह्यात बसफेऱ्या बंद

जालना जिल्ह्यातील मनोज जुरंगे-पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. त्यांचे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. त्यानंतर अनेक ठिकणी या घटनेविरोधात निषेध करण्यासाठी आदोलने होत आहेत. अशातच फुलंब्री येथील सरपंचाने आपली कार जाळून जालन्यातील घटनेचा निषेध केला. महामार्गावर आपल्या कारमधून उतरत सरपंचानी गाडीवर तेल ओतून गाडी पेटवून दिल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी