31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रएक फुल, दोन हाफ.... कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!

एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!

राज्याच्या राजकारणात एकमेकांवर शेलक्या शब्दात टीका करण्याची नवीन फॅशन आली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत टीव्हीवर विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी आरोप प्रत्यारोप करत असतात. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, नाना पटोले, विजय वडट्टीवार, संदीप देशपांडे आदी विविध पक्षांचे नेते कायम टीव्हीचा पडदा व्यापत आहे. उद्धव ठाकरे हेही कधीकधी विरोधकांची पिसे काढतात.

मुंबईमध्ये शिवसेना मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्रातील सरकारवर तुफान टीका केली. जालना येथील लाठीचार्ज प्रकरणाचे संदर्भ त्यांच्या भाषणात ठासून भरलेले होते. भाषणाच्या ओघात त्यांनी, ‘ एक फुल, दोन हाफ…. ‘ अशी टीका करताच, ती राज्याच्या कोणत्या नेत्यांसाठी कुणाला ते म्हणाले याची चर्चा सभागृहात होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शुक्रवारी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर राजकीय वातावरण तापले आहेत. जालना येथे पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती का? असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

जालना येथील घटनेवर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला होता. आज संध्याकाळी मी जालना जाणार आहे. नुसता निषेध करून चालणार नाही. विशेष म्हणजे यापूर्वीच सरकारवर ताशेरे न्यायालयाने मारले आहेत. आमची इंडियाची बैठक सुरु असताना एकाने पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे, पण राज्यात आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे याची यांना माहिती नाही. मुख्यंमत्री आणि गृहमंत्री यांना राज्यात काय सुरु आहे, कोठे आंदोलन सुरु आहेत याची रोज माहिती मिळत असते. पण दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. तर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला होता. आता चौकशी करून तुम्ही काय करणार, नुसत्या चौकश्या लावल्या जाताय, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा 

एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्यावा; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

जालना लाठीचार्जप्रकरणी भाजपाने माफी मागावी: सुप्रिया सुळे

राज ठाकरेंनी मराठा आंदोनलावरुन राज्याच्या कारभाऱ्यांना सुनावले; म्हणाले….

उद्धव ठाकरे जालना दौऱ्यावर!

जालना येथील घटनेनंतर उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जालना येथील दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई येथून उद्धव ठाकरे औरंगाबाद विमानतळावर पोहचतील, तेथून कारने ते जालना येथे जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर ते अंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्ते यांची भेट घेणार आहे. यावेळी ते गावकऱ्यांशी संवाद देखील साधण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी