31 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरक्रिकेटशुभमन गिलला डेंग्यू झाल्याने वर्ल्ड कप खेळणार का? राहुल द्रविडने स्पष्ट सांगितले..

शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने वर्ल्ड कप खेळणार का? राहुल द्रविडने स्पष्ट सांगितले..

भारताचा तडफदार खेळाडू शुभमन गिल हा काही दिवसांपासून कोणत्यानं कोणत्या कारणासाठी चर्चेत पहायला मिळत आहे. आयपीएल म्हणू नका किंवा वनडे सामने म्हणू नका तो आपली भूमिका चोख बजावतो. मात्र काही दिवसांपासून तो आजारी आहे. त्याला डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील शुभमन गिल खेळला नव्हता. त्याला विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तो डॉक्टरांच्या आदेशाचे पालन करत होता. यावर आता तो विश्वचषक खेळणार की नाही याबाबत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काय म्हणाले राहुल द्रविड?  

शुभमन गिलसारखा फलंदाज हा भारतात असणे ही फार गरजेचं आहे. यामुळे तो आजारी असल्याने खेळणार का? की त्या जागी इतर कुणाला संधी दिली जाईल. याबाबत आता राहुल द्रविड यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. ते म्हणाले की, “वर्ल्ड कप सुरू झाला आहे. यापूर्वीच गिल आजारी होता. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यासाठी सांगितली असून तो अजूनही डॉक्टरांच्या आदेशाचे पालन करत आहे. काही दिवसांपासून तो डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. भारताचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलियासोबत रविवारी 8 तारखेला होणार आहे. यासाठी काही तासांचा कालावधी आहे. या वेळात गिल बरा होईल, अशी आशा आहे.”

 

हेही वाचा 

भारताचे हे स्टार खेळाडू वर्ल्डकपनंतर निवृत्त होणार?

स्विंग बॉलिंगचा बादशाह झहीर खानचा आज वाढदिवस

आजपासून वनडे क्रिकेट विश्वचषकाला आरंभ

खेळण्याची संधी कोणाला द्यायची?  

पुढं ते म्हणाले की, “गिलला बरं वाटत आहे. असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे तो मॅचपूर्वी फिट होईल. कोणाला खेळवायचं किंवा कोणाला खेळवायच नाही हा निर्णय सामना सुरू होण्यापूर्वी काही तास अगोदर घेतला जातो. जर गिल तोपर्यंत बरा झाला किंवा फिट असेल तर आमची पसंती ही गिलला आहे.” त्याचप्रमाणे भारताचा खेळाडू हार्दिक पांड्याच्या हाताला दुखापत झाली आहे. यामुळे भारताची काहीशा प्रमाणात डोकेदुखी वाढू शकते. तर एका वृत्तपत्रातून गिलला डेंग्यू झाल्याचं बोललं जात होतं. तर काही वर्तमानपत्रात गिल आजारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत क्रिकेट असोसिएशनने अधिकृतरीत्या माहिती दिली नाही. तसेच गिलच्या आजारपणावर सारा तेंडुलकरने गिलबाबत ट्वीट करत प्रार्थना केली आहे.

ट्वीट करत काय म्हणाली सारा 

सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरने शुभमन गिलबाबत ट्वीट केले आहे. काही दिवसांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून सारा आणि शुभमन गिल यांचे अनेक फोटोज व्हायरल होताना दिसत आहे. यांच्या चर्चा देखील अधिक पहायला मिळत आहेत. गिल आजारी असल्याने गेट वेल सून असे कॅप्शन देत. x अकाऊंटवर साराने गिलचा फोटो पोस्ट केला आहे. यामुळे अधिकच चर्चा पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी