33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रिकेटस्विंग बॉलिंगचा बादशाह झहीर खानचा आज वाढदिवस

स्विंग बॉलिंगचा बादशाह झहीर खानचा आज वाढदिवस

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता कॉमेंट्री करतो. आयपीएलमध्येही त्याने आतापर्यंत प्रशिक्षकपदाची जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली आहे. झहीर सोशल मीडियावर अधूनमधून फोटो पोस्ट करत चाहत्यांना आपली माहिती देत असतो पण मराठी मुलुखात वाढलेल्या जहीरला फारसे प्रसिद्धीचे वेड नाही. आज 7 ऑकटोबरला जहीर आपल्या वयाची 44 वर्ष पूर्ण करतोय.

फारच कमी जणांना माहित असेल की जहीर हा मराठी असून तो उत्तम मराठी बोलतो. महाराष्ट्रातील शिर्डीजवळील श्रीरामपूर येथे जन्मलेल्या जहीरवर मराठी संस्काराचं जास्त प्रभुत्व आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांच्या नावावरून त्याचे नाव जहीर ठेवले गेले. वडिलांचे नाव बख्ख्तीयार खान तर आईचे नाव झकिया खान आहे. झहीर खान हा मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. वडील फोटोग्राफर तर आई शिक्षिका. झहीर खानला दोन भावंड आहेत. झहीरला झीशन हा मोठा भाऊ आणि अनिस हा लहान भाऊ आहे.


त्याचे टोपण नाव झॅक असे आहे. जहीरचे प्राथमिक शिक्षण श्रीरामपूर येथील हिंद सेवा मंडळ नवीन मराठी प्राथमिक शाळेत झाले. जहीर पुढील शिक्षणासाठी मुंबईत आला. त्याने विद्याविहार येथील के जे सोमय्या महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेतले. यानंतर झहीरने मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला.

कारकिर्दीची सुरुवात

झहीरची क्रिकेटची आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याला वेगवान गोलंदाज बनण्याचा सल्ला दिला. वडिलांनी त्याला वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईच्या राष्ट्रीय क्रिकेट क्लबमध्ये दाखल केले होते. त्याचे प्रशिक्षक भारताचे माजी क्रिकेटपटू सुधीर नाईक यांनी जहीरला क्रिकेटवरती जास्त लक्ष देण्यास सांगितल्याने त्याने इंजिनिअरिंग सोडले. 2000 साला पासून झहीरच्या क्रिकेट श्रेत्रातील कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. कपिलदेव नंतरचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून जहीर खानला पाहिले जाते. झहीर खान हा कसोटी क्रिकेट मधील सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज आहे.


झहीर खानला 2003 आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. भारताने हे विश्वचषक मोठ्या फरकाने गमावले होते. मात्र, संपूर्ण विश्वचषकातील 11 सामन्यात 20.77 च्या सरासरीने 18 विकेट्स घेत झहीर सर्वाधिक विकेट्स घेणारे चौथे फलंदाज ठरले होते. 2011 साली झहीरला दुसऱ्यांदा आयसीसी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी संपूर्ण विश्वचषकात 18.76 च्या सरासरीने 21 विकेट्स घेत तो पाकिस्तानच्या शाहिद अफ्रिदीसह विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

हे ही वाचा 

भारताचे हे स्टार खेळाडू वर्ल्डकपनंतर निवृत्त होणार?

यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पुन्हा दिसणार सचिन तेंडुलकर, आयसीसीची मोठी घोषणा…

Cricket World Cup 2023 थरार रंगणार; टीम इंडियासह इतर देशांच्या संघांची गेल्या चार वर्षांतील कामगिरी कशी होती ?

23 नोव्हेंबर 2017 रोजी जहीरने ‘चक दे ​​इंडिया’ चित्रपटातील अभिनेत्री सागरिका घाटगे सोबत लग्न केले. दोघांनीही 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत भव्य रिसेप्शन झाले.

झहीर खानने 15 ऑक्टोबर 2015 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2017 मध्ये, जसप्रीत बुमराह सारख्या प्रतिभावानांना मदत करण्यासाठी झहीर खानची भारतीय क्रिकेटचा गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2020 मध्ये भारत सरकारने झहीरला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी