27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeक्रिकेटयंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पुन्हा दिसणार सचिन तेंडुलकर, आयसीसीची मोठी घोषणा...

यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पुन्हा दिसणार सचिन तेंडुलकर, आयसीसीची मोठी घोषणा…

वर्ल्डकप २०२३ अगदी एका दिवसावर येऊन ठेपला आहे. भारतातच नाही तर जगात क्रिकेट वर्ल्ड कपचे वेड चाहत्यांना आहे. हा वर्ल्ड कप यावर्षी कशा पद्धताने पार पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विश्वचषक सुरु होण्याच्या सुरुवातीला आयसीसीने भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला जागतीक राजदुत (ब्रँड अँम्बेसेडर) म्हणुन गौरवण्यात आलं. या विश्वचषकाची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणार आहे. यावेळी सचिन तेंडुलकर विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन येणार आहे. हे यापुर्वी कधीच घडलं नाही. यामुळे या विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात 100 शतक करुन विश्वविक्रम केला आहे. आजही हा विक्रम अबाधीत आहे.

उद्या गुरुवारी, (5 ऑक्टोबर) या दिवशी 2023 च्या वनडे आंतरराष्ट्रीय विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या दिवशी सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. यासाठी सर्व संघाचे कर्णधार तयार झाले आहेत. सर्व कार्यक्रमाची तयारी देखील झाली आहे. मात्र यात आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेट विश्वातील मास्टरब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर याला वनडे आंतरराष्ट्रीय विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून गौरवण्यात आलं आहे. यामुळे भारताचे चाहते फार खुश आहेत. तसेच त्याने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


“वर्ल्डकपमुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल” – सचिन तेंडुलकर

“१९८७ साली बॉल बॉय ते देशाचं प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा वर्ल्ड कपचा प्रवास हृद्याच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवला आहे. २०११ चा वर्ल्ड कप हा अविस्मरणीय होता. असं सचिन तेंडुलकर यांनी माहिती प्रसिद्धपत्रकात दिली आहे. तसेच अनेक युवा खेळाडूना या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमधून प्रेरणा मिळेल. यासाठी अनेक संघ सज्ज आहेत. यामुळे तरुण खेळाडूंना खेळाजवळ येण्याची आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आणि प्रेरणा मिळते.” असे सचिन तेंडुलकर म्हणाला आहे. त्याचप्रमाणे याच विश्वषकात सर्वच संघ कसून सराव करत असून यात आता भारताच्या क्रिकेट संघाच्या खेळाडूंची नावे समोर आली आहेत.

हे ही वाचा 

Cricket World Cup 2023 थरार रंगणार; टीम इंडियासह इतर देशांच्या संघांची गेल्या चार वर्षांतील कामगिरी कशी होती ?

वर्ल्डकपआधी भारताची अग्निपरीक्षा! आजपासून बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत रंगणार वन-डे मालिका

‘ड्रीम11’ला 40 हजार कोटींचा करचुकवल्याची नोटीस? कंपनीची थेट उच्च न्यायालयात धाव

आयसीसी वनडे वर्ल्ड कप क्रिकेट संघ भारत –

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयश अय्यर, रवींद्र जडेजा, के.एल.राहुल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, राविचंन्द्रन अश्विन, इशान किशन आणि सुर्याकुमार यादव हे संघात मुख्य खेळाडू आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी