28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्राईमनाशिकमध्ये कार अन् दुचाकीची समोरासमोर झाली मोठी धडक; चिमुकला जागीच ठार

नाशिकमध्ये कार अन् दुचाकीची समोरासमोर झाली मोठी धडक; चिमुकला जागीच ठार

पाथर्डीफाटा-वडनेर रस्त्यावरून सुसाट कार व दुचाकी दामटविणाऱ्या दोन्ही वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी (दि.१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक < Collide > झाली. या धडकेत दुचाकीवर बसलेला तत्सम राहुल पाटील (६) हा मुलगा ठार झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक आसिफ गुलाब शेख व दुचाकीचालक राहुल सिद्धार्थ पानपाटील या दोघांविरूद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पाथर्डीसर्कलकडून भरधाव जाणारी कार (एम.एच१५ डीएम १२३०) व पाथर्डीफाट्याकडून पाथर्डीसर्कलकडे जाणारी दुचाकी (एम.एच१५ एचएक्स २४३९) या वाहनांवरील वाहनचालक अनुक्रमे आसिफ व राहुल यांचा वाहनावरील ताबा सुटला. (A car and a two-wheeler collided head-on in Nashik; The child died on the spot. )

यामुळे दत्तमंदिराकडे डाव्या बाजुच्या वळणाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहनांचा वेग इतका जास्त होता की कार, दुचाकींचेकीं चेनुकसान होऊन दुचाकीवर बसलेला सहा वर्षाचा तत्सम रस्त्यावर बाजूला फेकला गेला. यामुळे त्याच्या डोक्याला मार लागून गंभीर स्वरूपात दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यास जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र वैद्यकिय अधिकारी यांनी उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तपासून घोषित केले. हा अपघात झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच आनंदनगर पोलिस चौकीचे सहायक उपनिरिक्षक रियाज शेख हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. याठिकाणी दोन्ही वाहने अपघातग्रस्त स्थितीत आढळून आली. शेख यांनी सरकारकडून फिर्यादी होत दोन्ही वाहनचालकांविरूद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यामुळे त्याच्या डोक्याला मार लागून गंभीर स्वरूपात दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यास जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र वैद्यकिय अधिकारी यांनी उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तपासून घोषित केले. हा अपघात झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच आनंदनगर पोलिस चौकीचे सहायक उपनिरिक्षक रियाज शेख हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. याठिकाणी दोन्ही वाहने अपघातग्रस्त स्थितीत आढळून आली. शेख यांनी सरकारकडून फिर्यादी होत दोन्ही वाहनचालकांविरूद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी