30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमनाशिकच्या सहवासनगर येथे मामाच्या बचावासाठी आलेल्या तरुणावर मद्यधुंद टोळक्याने केला धारदार शस्त्राचा...

नाशिकच्या सहवासनगर येथे मामाच्या बचावासाठी आलेल्या तरुणावर मद्यधुंद टोळक्याने केला धारदार शस्त्राचा हल्ला

मामाचा वाद मिटविणे भाच्याच्या जिवावर बेतल्याची घटना ग्रामदैवत कालिका माता मंदिर परिसरातील सहवासनगर भागात घडली. या घटनेत मामाच्या बचावासाठी आलेल्या तरुणावर मद्यधुंद टोळक्याने केलेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांतच नऊ संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल कृष्णा वांगडे (वय १८), नितीन शंकर दळवी (वय १८), नीलेश रवि नायर (वय २६), ऋषीकेश संतोष जोर्वेकर (वय २०), प्रवीण पुंडलिक लिंबारे (वय १८), अजय संतोष शिंदे (वय १८)

मामाचा वाद मिटविणे भाच्याच्या जिवावर बेतल्याची घटना ग्रामदैवत कालिका माता मंदिर परिसरातील सहवासनगर भागात घडली. या घटनेत मामाच्या बचावासाठी आलेल्या तरुणावर मद्यधुंद टोळक्याने केलेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात ( Attacked ) १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांतच नऊ संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल कृष्णा वांगडे (वय १८), नितीन शंकर दळवी (वय १८), नीलेश रवि नायर (वय २६), ऋषीकेश संतोष जोर्वेकर (वय २०), प्रवीण पुंडलिक लिंबारे (वय १८), अजय संतोष शिंदे (वय १८) (A youth was attacked with a sharp weapon by an inebriated gang at Sahasnagar in Nashik )

आदित्य राजू महाले (वय १९), देव संगीता वाघमारे (वय २०), रोशन भगवान माने (वय २२, सर्व रा. कालिका मंदिरामागे, सहवासनगर, कालिकानगर झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेत पीयूष भीमाशंकर जाधव (वय १९, रा. सहवासनगर) या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी संतोष भालेराव यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, कालिकानगर परिसरातील नागरीक उकाड्यामुळे शुक्रवारी (दि. १९) रात्री अंगणात गप्पा मारत होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास सहवासनगर येथे पीयूष जाधव याचा मामा यादव धर्मा लहानगे (वय २५) याच्याशी काही मद्यधुंद तरुणांनी मागील वादाची कुरापत काढून वाद घातला. पीयूष जाधव याने परिचित असलेल्या परिसरातील संतप्त तरुणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोळक्यातील तरुण त्याच्यावर तुटून पडले. या हाणामारीत एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. पीयूष जमिनीवर कोसळताच टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पीयूषला रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून टोळक्यातील तरुणांची धरपकड सुरू केली. परिसर पिंजून काढत रात्रीतून काही संशयितांना ताब्यात घेतले. तर दुसºया दिवशी विशेष पथकाने मखमलाबाद शिवारातून पाच जणांना ताब्यात घेत मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.तर दुसºया दिवशी विशेष पथकाने मखमलाबाद शिवारातून पाच जणांना ताब्यात घेत मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी