29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्राईमअॅपवरुन कर्ज घेतले; सायबर गुंडाने नग्न फोटो व्हायरल करत उकळले लाखो रुपये

अॅपवरुन कर्ज घेतले; सायबर गुंडाने नग्न फोटो व्हायरल करत उकळले लाखो रुपये

पूर्वी चाकू, सुरा दाखवून भामटे पैशांची लूबाडणूक करायचे मात्र आता हे भामटे तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन लोकांना वेगवेळी प्रलोभणे दाखवतात, कधी भीती दाखवतात आणि लाखो रुपये उकळतात. अशीच सायबर क्राईमची एक घटना समोर आली असून एका व्यक्तीने अॅपवरुन कर्ज घेतले त्यानंतर सायबर गुंडाने कर्जदार व्यक्तीकडून पैसे उकळणे सुरु केले. पैसे दिले नाहीत म्हणून समाजमाध्यमात पिडीताचा नग्न फोटो व्हायरल केला. त्यानंतर वारंवार पैसे उकळले. याबाबत एल टी मार्ग पोलिसांनी सायबर लुटारुला कर्नाटकातून अटक केली आहे.

हे प्रकरण एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलं आहे. फिर्यादी हे एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात. त्यांनी तक्रार दाखल केली होती. फिर्यादीने खाजगी अॅपवाल्याकडून कर्ज घेतले होतं. ऑक्टोबर 22 ते फेब्रुवारी 23 या काळात हे कर्ज घेतलं होतं. त्यांनी कर्ज घेतलं होतं 2 लाख 93 हजार 700 रुपये. याची प्रोसेसिंग फी आणि व्याज कापून त्यांना 1 लाख 95 हजार 390 रुपये देण्यात आले होते. यानंतर ही फिर्यादी यांनी नियमित हफ्ता भरला. त्यांना पैसे भरा म्हणून सतत फोन यायचे. फिर्यादी यांनी एकूण 5 लाख 3 हजार 857 एवढी रक्कम भरली. मुद्दल पेक्षा दीडपट अधिक रक्कम भरली.

यानंतर ही पैसे भरा म्हणून त्यांना फोन यायचे. धमक्या यायच्या. आपण 2 लाखाच्या लोनच्या बदल्यात 5 लाख रुपये भरले आहेत. त्यामुळे आता आपण पैसे भरणार नाही,अस फिर्यादी यांनी संगीतल्यावर फोन यायचे वाढले. धमक्या येऊ लागल्या. पैसे नाही भरले तर तुमचा नग्न फोटो तुमच्या मित्रांना पाठवला जाईल, अशी ही धमकी दिली गेली. तरी ही फिर्यादी यांनी पैसे न भरल्याने त्याचा चेहरा असलेला नग्न फोटो त्यांच्या मित्रांना पाठवण्यात आला.

याबाबत फिर्यादी यांनी एल टी मार्ग पोलीस स्टेशन येथे तक्रार केली. गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा तपास सुरू झाला. त्यावेळी आरोपी हा कर्नाटक राज्यातील विजापूर येथे असल्याचं तर कार्ड मध्य प्रदेशातील असल्याचं उघडकीस आलं. पोलिसांच एक पथक विजापूर येथे गेलं. पण आरोपी अनेक सिम कार्ड वापरत असल्याने हाती लागतं नव्हता.अखेर त्याला अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा
सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले; मुंबई मेट्रोला १० लाखांचा दंड ठोठावला

आप्पासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ श्री सदस्यांना मृत्यू भीषण..नेटकरी बरसले !

‘श्री सदस्यां’च्या मृत्युस आयोजकांसह अमित शाह कारणीभूत; विरोधी पक्षांचा घणाघात

त्याच्या विरोधात भादवी 419, 420 आणि 500 कलमा नुसार आणि सायबर ऍक्टच्या 66(क) , 66(ड) 69(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीचे वेगवेगळ्या बँकांत 22 खाती आहेत.त्यात तो पैसे पाठवायला सांगायचा. आरोपीला तर अटक केली आहे. आता त्याच्या सोबत अजून आरोपी आहेत का? ऍपचा आणि आरोपीचा काय संबंध आहे. फिर्यादीच्या मित्रांचे नंबर आरोपी याच्याकडे कसे आले. आरोपी कसलं रॅकेट चालवत आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी