33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमपोलीस भरती परीक्षेत कॉपीचे प्रकार उघड ,सूक्ष्म यंत्राचा वापर करून सुरू होती...

पोलीस भरती परीक्षेत कॉपीचे प्रकार उघड ,सूक्ष्म यंत्राचा वापर करून सुरू होती कॉपी

मुंबई मध्ये सध्या पोलीस भरती सुरू आहे.सुमारे एक हजार पद भरली जात आहेत.यावेळी परीक्षार्थी कॉपी करत असल्याचं उघडकीस आलं आहे.या कॉपी प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.भांडुप पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्रतील जिल्हे आणि मुंबई पोलीस दलात भरती सुरू आहे.महाराष्ट्र पातळीवर पाच हजार तर मुंबईत एक हजार पोलीस कर्मचारी यांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत ही एक हजार पदासाठी भरती सुरू असताना हजारो अर्ज आले आहेत.प्रथम मैदानी परीक्षा होत असते.त्यानंतर लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी होत असते.त्यातून निवड केली जात असते.

मुंबई पोलीस दलातील भरतीचा मैदानी परिक्षेचा टप्पा झाला आहे.आता लेखी परीक्षा सुरू आहे. मुंबईतील वेगवेगळ्या शाळेत ही परीक्षा सुरू आहे.लेखी परीक्षेत कॉपी होत असल्याचा प्रकार आज भांडुप येथे उघडकीस आला आहे.पोलीस भरती परिक्षेत फसवणूक करणारे परिक्षार्थी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राईट स्कूल, व्हिलेज रोड, भांडुप पश्चिम येथे भरतीमची लेखी परीक्षा सुरू होती.परीक्षा केंद्र क्रमांक 07 02 रूम नंबर 210 मध्ये एक परीक्षार्थी क्र.36215 बबलू मदनसिंग मेंढरवाल वय 24 वर्ष मुक्काम पोस्ट इब्राहिमपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना त्याच प्रमाणे नितेश रघुनाथ आरेकर, वय 29 हे दोघे जालना येथे राहणारे आहेत.त्यांनी परीक्षेच्या वेळी त्याचे कानात सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर करून सदर डिवाइस च्या साहाय्याने कॉपी करताना आढळून आलेत.

हे सुद्धा वाचा

महिलांसाठी आनंदाची बातमी! आता घरी बसून करता येणार बसचे बुकिंग

परदेशात शिकणाऱ्या मुलाला शिष्यवृत्ती न मिळाल्याने बापासमोर कर्जाचे डोंगर

वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी; उद्धव ठाकरेंची सामना अग्रलेखातून टीका

यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्याचे वर भांडुप पो ठाणे गु र क्र 320/2023 कलम 417,419,420,34 भा द वि सह कलम 7,8 महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या आणि इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघाना अटक करण्यात आली आहे.यानंतर आता परीक्षार्थी यांची कसून तपासणी करून त्यांना परीक्षेत बसू दिल जात आहे.

Copies revealed in police recruitment exam
Copying started using a microscopic device

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी