27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्राईमIAS अस्तिक कुमार पाण्डेय यांची होणार 'ईडी' चौकशी

IAS अस्तिक कुमार पाण्डेय यांची होणार ‘ईडी’ चौकशी

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेच्या निवेदाप्रक्रियेत घोटाळाप्रकरणी त्यांना सक्तवसूली संचलनालय (ईडी) ने नोटीस बजावली आहे. पाण्डेय यांना आज (दि.8) मुंबईत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसीमधून देण्यात आले आहेत.

पंतप्रधान आवास योजनेतून महापालिका हद्दीमध्ये 40 हजार घरे बांधण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी अस्तिककुमार पांण्डेय हे महापालिका आयुक्त होते. पालिकेने काढलेल्या या निविदा प्रक्रियेमध्ये कंपनीकडून घोटाळा केल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ईडीने कंपनीशी संबंधीत लोकांवर छापेमारी देखील केली. त्यानंतर याप्रकरणात प्रकरणात महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांची देखील ईडीने चौकशी केली होती. आता जिल्हाधिकारी पाण्डेय यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे.

हे सुद्धा वाचा

महिलांसाठी आनंदाची बातमी! आता घरी बसून करता येणार बसचे बुकिंग

परदेशात शिकणाऱ्या मुलाला शिष्यवृत्ती न मिळाल्याने बापासमोर कर्जाचे डोंगर

डीजेच्या तीव्र आवाजामुळे कोमात गेलेल्या वयस्कर शिक्षकाचा मृत्यू

पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यानंतर सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि ईडीने त्यात लक्ष घातले. ईडीने पालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली. तसेच अनेक कागपत्रे देखील ताब्यात घेतली होती. 20 मार्च रोजी उपायुक्त अपर्णा थेटे यांना देखील चौकशीला बोलावले होते. सन 2015 पासून येथे पंतप्रधान आवास योजनेची प्रक्रिया सुरु केली होती. ईडीकडे या योजनेसंदर्भातील 2015 ते 2023 दरम्यानची कागदपत्रे पालिकेने सादर केल्याचे देखील सांगितले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी