28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्राईममुंबई विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली ,विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर

मुंबई विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली ,विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर

अंधेरी,जरीमरी येथील मुंबई विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली आहे.त्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरु झाले नसून फक्त पत्र्याने परिसर बंदिस्त केला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी 6.40 वाजता घडली. विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर असून प्रशासन ढीम्म गतीने काम करत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट करत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.कुर्ला अंधेरी मार्गावरील जरीमरी कब्रस्तान समोर भिंत कोसळली आहे.ही भिंत रनवे ला लागूनच आहे. याठिकाणी पालिकेचे काम सुरु असून जेसीबीमुळे भिंत कोसळण्याची शक्यता आहे.विमानतळ प्रशासनाने ज्या तीव्रतेने कारवाई करणे गरजेचे आहे, त्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस भरती परीक्षेत कॉपीचे प्रकार उघड ,सूक्ष्म यंत्राचा वापर करून सुरू होती कॉपी

IAS अस्तिक कुमार पाण्डेय यांची होणार ‘ईडी’ चौकशी

डीजेच्या तीव्र आवाजामुळे कोमात गेलेल्या वयस्कर शिक्षकाचा मृत्यू

अनिल गलगली यांच्या मते अश्या वेळी भिंत जलद गतीने बांधणे आवश्यक असताना फक्त पत्र्याने काय होईल, हा मोठा प्रश्न आहे.हा भाग उघडा राहिला तर कोणीही व्यक्ती थेट रणवे वर जाऊ शकतो. आणि विमाना बाबत काहीही करू शकतो.हा खर तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. याबाबत विमानतळ प्राधिकरणाने तात्काळ पावलं उचलणं आवश्यक असल्याचे ही गलगली यांनी सांगितलं.

A wall near the Mumbai airport runway collapsed, airport security on alert

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी