32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्राईमनाशिक डॉक्टर प्राणघातक हल्ला श्रेय वादग्रस्त कर्मचाऱ्याला

नाशिक डॉक्टर प्राणघातक हल्ला श्रेय वादग्रस्त कर्मचाऱ्याला

डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या संशयित आरोपीला त्याच्या भावाने पोलिसांच्या स्वाधीन केल्याने संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, याचे सर्व श्रेय "त्या" वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला दिल्याने पोलीस वर्तुळात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या बेबंदशाही कारभारामुळे प्रामाणिक पोलिसांवर मानसिक ताण वाढला जाऊन त्यांच्या नियमित कामकाजावर परिणाम होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिककरांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच आपल्या पोलीस दलात सुरु असलेल्या अशा चुकीच्या गोष्टीना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. यासाठी आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी एकांतात वन टू वन चर्चा करून त्यांचे या वादग्रस्त कर्मचाऱ्याबाबत मत जाणून घेणे गरजेचे आहे.

डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या संशयित आरोपीला त्याच्या भावाने पोलिसांच्या स्वाधीन केल्याने संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, याचे सर्व श्रेय “त्या” वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला दिल्याने पोलीस वर्तुळात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या बेबंदशाही कारभारामुळे प्रामाणिक पोलिसांवर मानसिक ताण वाढला जाऊन त्यांच्या नियमित कामकाजावर परिणाम होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिककरांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच आपल्या पोलीस दलात सुरु असलेल्या अशा चुकीच्या गोष्टीना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. यासाठी आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी एकांतात वन टू वन चर्चा करून त्यांचे या वादग्रस्त कर्मचाऱ्याबाबत मत जाणून घेणे गरजेचे आहे. हा सर्व उहापोह या व्हिलनच्या भूमिकेत असलेल्या कर्मचाऱ्याला पोलीस आयुक्तांसमोर हिरो बनविण्यासाठी सुरु असल्याची देखील चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुयोग हॉस्पिटलचे डॉ. कैलास राठी यांच्यावर शुक्रवार दि. २३ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संशयित राजेंद्र चंद्रकांत मोरे याने कोयत्याने प्राणघातक हल्ला करून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकातील दिवस आणि रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांनी वेळेचे बंधन न पाळता संशयितांचा माग काढण्यासाठी रात्र जागून काढली. या संशयिताबाबत अनेक माहिती काढून ती वरिष्ठाना देण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले होते. या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित राजेंद्र मोरे याचा भाऊ गणेश मोरे याच्याशी संपर्क साधून त्याच्यामार्फत संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे सांगण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे गणेश मोरे यांनी आपल्या भावाला शनिवार दि. २४ रोजी चांदवड येथून बोलावून घेत दुपारच्या सुमारास दिंडोरी रोडवर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे या संशयिताला पकडण्यासाठी शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले असलेल्या या वाक्याला काही महत्व उरत नाही. मात्र, याचे सर्व श्रेय “त्या” वादग्रस्त कर्मचाऱ्याला देण्यात आले असल्याची प्रेसनोट प्रसारित करण्यात आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही रात्रभर जागून संशयिताच्या मागावर राहिलो याला काहीच महत्व नाही का असाही सूर त्यांनी आवळत अशा पद्धतीने काम सुरु झाल्यास प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी काम कसे करावे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त कारकीर्द मध्ये अडकलेल्या “त्या” कर्मचारी वजा सुभेदाराची चर्चा कायमच प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. विशेष म्हणजे या वादग्रस्त कर्मचाऱ्याची वर्षभरात तिसऱ्यांदा मनमर्जी प्रमाणे बदली करण्यात येऊन पसंतीचे पोलीस ठाणे देण्यात आले आहे. त्यामुळे या वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला नेमके कोणाचे पाठबळ आहे याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे. पंचवटी, भद्रकाली पोलीस ठाण्यात असताना आपल्या विविध लीलांनी पोलीस दलाची बरीच बदनामी झाली होती. याबाबत या कर्मचाऱ्याची चौकशी देखील सुरु करण्यात आली होती. मात्र, राजकीय दबाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे दुसऱ्या कर्मचाऱ्याचा बळी देत या कर्मचाऱ्याने सुचविलेल्या आडगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्याने काही दिवसातच पुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात आपली बदली करून घेत एकप्रकारे पोलीस दलात आपले किती वजन आहे आणि आपली पोहच वरपर्यंत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत इतर कर्मचाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या डोळ्यात धूळफेक करत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट या वादग्रस्त कर्मचाऱ्याची अवघ्या काही दिवसात आडगाव पोलीस ठाण्यातून पंचवटी पोलीस ठाण्यात बदली करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे या वादग्रस्त महानुभावांनी आजपर्यंत पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यातच आपली सेवा बजावली आहे. उर्वरित त्यांचा कार्यकाळ उचलबांगडी झाल्याने पोलीस अकादमी, स्पेशल ब्रांच याठिकाणी गेला आहे. याबाबत या पोलीस कमर्चाऱ्याचे सर्व्हिस शीट तपासल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. तसेच, या कर्मचाऱ्याबाबत अनेक तक्रार अर्ज पोलीस आयुक्तालयात पडून आहे त्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वादग्रस्त कर्मचाऱ्यामुळे एका पोलीस हवालदाराने पोलीस दलाला रामराम केला आहे. याबाबत पोलीस आयुक्तांना लेखी पत्र देत या कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून पोलीस हवालदाराची नोकरी सोडत असल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

या वादग्रस्त कर्मचाऱ्याला खाकीची ऍलर्जी असल्याची चर्चा खुद्द पोलीस दलात रंगली आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि बोटावर मोजण्याइतक्या दिवशीच या कर्मचाऱ्याने अंगावर खाकी परिधान केली असावी, बाकी इत्तर दिवशी सिव्हिल ड्रेसमध्ये साहेबांच्या मागे शेपटीसारखा फिरताना दिसून येत असतो. त्यामुळे साहेबांचा खास माणूस म्हणून त्याला इतर कर्मचारी घाबरत असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच तो म्हणेल त्यावेळी मागेल ते पोलीस ठाणे मिळत असल्याने त्याचा दबदबा अजूनच वाढत चालला असून दुसरीकडे प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांना याचा मानसिक ताण वाढत आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी मानसिक तणावातून अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली होती. त्यामुळे मानसिक तणावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलू नये म्हणजे झाले. कारण एकीकडे बदलीसाठी वरिष्ठांचे उंबरठे झिझवून देखील प्रशासकीय करणे देत बदली होत नाही. आणि दुसरीकडे वादग्रस्त कारकीर्द असलेल्या कर्मचाऱ्याला वारंवार मर्जीतील ठिकाणी आणि तेही एका वर्षात तीन पोलीस ठाण्यात बदली दिली जात असल्याने पाणी कुठेतरी मुरत असल्याचे पोलीस आयुक्तांनी समजून घेणे गरजेचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी