31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमपालिका कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून गाेदापात्रात फेकले, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

पालिका कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून गाेदापात्रात फेकले, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याचे बुधवारी (दि. १) दुपारी उघड झाले. रामवाडीनजीक गाेदापात्रात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्यावर वार करून ओळख पटण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला. पाेलिसांच्या तपासात हा मृतदेह पंचवटीतीलच रहिवासी असलेल्या महापालिका कर्मचारी अरुण बर्वे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पंचवटी पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत कुठलेही धागेदाेरे पाेलिसांच्या हाती लागलेले नव्हते.

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची (NMC employee) तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या (murder) करण्यात आल्याचे बुधवारी (दि. १) दुपारी उघड झाले. रामवाडीनजीक गाेदापात्रात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्यावर वार करून ओळख पटण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला. पाेलिसांच्या तपासात हा मृतदेह पंचवटीतीलच रहिवासी असलेल्या महापालिका कर्मचारी अरुण बर्वे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पंचवटी पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत कुठलेही धागेदाेरे पाेलिसांच्या हाती लागलेले नव्हते.(NMC employee murdered with sharp weapon, dumped in a gorge, tries to burn body)

याबाबत परिसरातील रहिवाशांनी पंचवटी पाेलिसांना कळविताच ते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची तपासणी केली असता पोट, हात, डोके आणि पाठीवर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करून त्याचा खून केल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटत नसतानाच काही युवकांनी त्यास ओळखले. शहानिशा झाल्यावर उदय काॅलनी, स्नेहल पार्क येथील रहिवासी अरुण अशोक बर्वे यांचा खून झाल्याचे समाेर आले. बर्वे महापालिकेच्या पश्चिम विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. पाेलिसांनी त्यांचे मित्र, कुटुंबीयांसह सहकाऱ्यांशी बाेलून खुनामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठलेही धागेदाेरे हाती लागले नाही. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फाैजफाटा हजर झाला हाेता.

एकलहरा येथील घटनेप्रमाणे या घटनेतही बर्वे यांचा खून केल्यानंतर संशयितांनी ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यांच्या मानेचा खालचा भाग, डाव्या हाताच्या काेपऱ्याची त्वचाही जळालेली हाेती. बर्वे यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार असून त्यांच्या निधनाने परिसरात शाेककळा पसरली आहेे. पंचवटीत एकापाठाेपाठ खुनाच्या घटना घडत असल्याने भीतीचे वातावरण आहे.

या प्रकरणात पाेलिसांनी दाेघांना अटक केली असली तरी आणखी काही गुन्हेगार पकडले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  बुधवारी (दि. १) अरुण बर्वे यांच्या खुनाची घटना समाेर आल्याने शहरात पाेलिसांची गस्त, खबऱ्यांचे जाळे असे काही आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाेलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.अरुण बर्वे यांच्या खुनाची घटना समाेर आल्याने शहरात पाेलिसांची गस्त, खबऱ्यांचे जाळे असे काही आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाेलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी