28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्राईमनाशकातील पंचवटी पोलीस ठाण्याचा कारभार रॉकेटसारखा धावणार : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

नाशकातील पंचवटी पोलीस ठाण्याचा कारभार रॉकेटसारखा धावणार : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

पंचवटी पोलीस ठाण्याचा कारभार रॉकेट सारखा धावणार असल्याचे उद्गार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून नागरिकांना हस्तांतरित करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी काढले. या कार्यक्रमामध्ये ३० मोबाईल, चार दुचाकी आणि सोन्याचे २९. ७ ग्रॅमचे दागिने, चांदीचे अडीचशे ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण ७ लाख २७ हजार १०४ रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आला. यावेळी नागरिकांनी पोलिसांच्याप्रती आपले मनोगत व्यक्त करून त्यांचा सत्कार केला.गेल्या काही दिवसांपासून पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी, मोबाईल चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरु झाले होते.

या दरम्यान पंचवटी पोलीस ठाण्याचा कारभार वारिठा पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घेताच त्यांनी आपले पोलीस प्रशासन कामाला लावत चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये पंचवटी पोलिसांना मोठे यश आले होते. चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आला. यावेळी पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे आदींसह पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर कड यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील यांनी मानले. तर नागरिकांच्या वतीने गोरख भोये आणि विलास वैद्य यांनी पोलिसांप्रती आभार व्यक्त करून पोलीस आयुक्त कर्णिक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी चोरीस गेलेले मोबाईल, दुचाकी आणि सोन्याचांदीचे दागिने परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता
.
यावेळी आपल्या मनोगतात बोलताना संदीप कर्णिक यांनी सांगितले कि, जो अधिकारी, कर्मचारी काम करेल त्याचे श्रेय त्यालाच दिले पाहिजे. जेणे करून भविष्यात त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढण्यास मदत मिळेल. मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचा कारभार रॉकेट सारखा चालणार असल्याचे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांच्या डिटेक्शन वरून दिसून येत असल्याचे सांगत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. सध्या इंटरनेटचे विश्व असल्याने आपण चांगले काम केले तर त्यांची नोंद प्रसार माध्यमातून थेट गुगल पर्यंत जाते आणि तेथील इतिहास पुसला जात नसल्याने भविष्यात आपले मुले, नातू, पणतू यांनी गुगलवर आपल्या कामाचे यश बघितल्यास त्यांना अभिमान वाटेल. यासाठी चांगले काम करण्यास सुरुवात करा. भविष्यात नाशिकला सिहंस्थ कुंभमेळा भरणार असल्याने सर्वांनी डोळ्यात तेल घालून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, नाशिकचे वातावरण बघून आपणही नाशिककर होण्याचा विचार करत असल्याचे सांगितले.
मोबाईल चोरीच्या प्रकरणात चांगली कामगिरी करणारे पोलीस अंमलदार श्रीकांत साळवे आणि तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला.

चोरी करणाऱ्या टोळ्या पकडून त्यांच्याकडून १०० मोबाईल हस्तगत करण्याचा मानस होता. मात्र, नागरिकांच्या आग्रहास्तव आम्ही हस्तगत केलेला मुद्देमाल परत केला आहे. यापुढे लवकरच अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल करून मुद्देमाल हस्तगत करण्याचा मानस आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात काही संशयास्पद हालचाली किंवा कोणी गुन्हेगार दिसल्यास पोलिसांना संपर्क करावा. यातून नागरिक आणि पोलिसांमधील नाते दृढ होऊन गुन्हेगारी आटोक्यात आणण्यास मदत होईल. : मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी