30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमसर्व्हिस रिव्हॉल्वरचा गैर वापर करणारा पोलीस नाईक बडतर्फ !

सर्व्हिस रिव्हॉल्वरचा गैर वापर करणारा पोलीस नाईक बडतर्फ !

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व्हिस रिव्हॉल्वर पोलीस ठाण्यात जमा न करता घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस नाईक याला बडतर्फ करण्यात आले आहे. विभागीय चौकशी केल्यानंतर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी हा कारवाईचा बडगा उगारला आहे. याच सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून या पोलीस नाईकाने आपल्या दोन सावत्र मुलांची हत्या केली असल्याचे सिद्ध झाल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनामध्ये मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व्हिस रिव्हॉल्वर  पोलीस ठाण्यात जमा न करता घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस नाईक याला बडतर्फ ( Police Naik sacked) करण्यात आले आहे. विभागीय चौकशी केल्यानंतर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी हा कारवाईचा बडगा उगारला आहे. याच सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून या पोलीस नाईकाने आपल्या दोन सावत्र मुलांची हत्या केली असल्याचे सिद्ध झाल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनामध्ये मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.(Police naik sacked for misusing service revolver)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, पोलीस नाईक संजय अंबादास भोये (सध्या नेमणूक पोलिस मुख्यालय) हे उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना २१ जून २०१९ रोजी साप्ताहिक सुटी होती. त्‍यामुळे २० जूनला ड्यूटी संपल्‍यावर त्‍यांच्‍याकडे असलेली सर्व्हिस रिव्‍हॉल्व्हर पोलीस ठाण्यातील कारकून यांच्‍याकडे जमा करणे आवश्‍यक होते. मात्र त्‍यांनी तसे न करता रिव्‍हॉल्व्हर स्‍वतःसोबत घरी नेली. साप्ताहिक सुटीच्‍या दिवशी परवानगी न घेता आपली सर्व्हिस रिव्‍हॉल्व्हर घरी नेली होती. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चा भंग झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्‍त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरु केली होती. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे निरीक्षकांकडे भोये यांची विभागीय चौकशी सुरू होती. त्यामुळे या चौकशीअंती त्यांना नोटीस बजावण्यात आली. पोलिस आयुक्तांनी भोये यांचे समक्ष म्हणणे ऐकून घेतले. या चौकशी मध्ये दोषी आढळून आल्याने पोलीस नाईक संजय अंबादास भोये यांना पोलीस दलातून सक्‍तीची सेवानिवृत्ती (बडतर्फ)देत कारवाईचा बडगा उगारला आहे. या शिक्षेविरुद्ध भोये यांना साठ दिवसांत महासंचालक कार्यालयात दाद मागता येणार आहे.
दोन सावत्र मुलांची हत्या – भोये हे उपनगर पोलिस ठाण्यात बीट मार्शल होते. साप्ताहिक सुटीच्या दिवशी संपत्तीच्या वादातून त्यांनी सोनू उर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५) आणि शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) या दोन सावत्र मुलांची सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळ्या घालून २१ जून २०१९ रोजी राहत्या घरात हत्या केली होती. पंचवटी परिसरातील अश्वमेध नगरात ही घटना घडली होती. त्याप्रकरणी भोये यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी काही साक्षीदार फितूर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या घटनेत सर्व्हिस रिव्हॉल्वरचा वापर झाल्याने त्यांची चौकशी सुरु होती. त्यामुळे आयुक्तालयाने हि कारवाई केली आहे.

वेतनवाढ रोख – मद्य सेवन करून विरुद्ध दिशेने वाहन चालवित पोलिस निरीक्षकास अपशब्द वापरल्याप्रकरणी अंमलदाराला शिक्षा देण्यात आली. अशोक वामन आघाव (नेमणूक पोलिस मुख्यालय) असे अंमलदाराचे नाव आहे. त्यांची एक वर्षाची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. दरम्यान, १६ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री आघाव हे सिन्नर फाटा येथे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने कार चालवत होते. त्यावेळी नाकाबंदी सुरू असताना पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी आघाव यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांशी हुज्जत घालत अपशब्द वापरले होते. त्यावर संशयित आघाव विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी आघाव यांची चौकशी पूर्ण झाल्यावर आयुक्तालयाने हि शिक्षा दिली आहे. त्यांनाही साठ दिवसांत महासंचालक कार्यालयात दाद मागता येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी