29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्राईमत्र्यंबकेश्वर येथे 54 हजार रुपयांचा बनावट मावा आणि पेढा विक्री करणाऱ्या दुकानांवर...

त्र्यंबकेश्वर येथे 54 हजार रुपयांचा बनावट मावा आणि पेढा विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे बनावट मावा आणि पेढा विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकून सुमारे 54 हजार रुपयांचा बनावट मावा आणि इतर पदार्थ नष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ही कारवाई अचानकपणे केल्यामुळे दुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे, तर धार्मिक स्थळी मिळणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांमुळे भाविक आणि पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयातर्फे धार्मिक स्थळे व यात्रेच्या ठिकाणी उन्हाळी सुट्यांच्या पा र्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त व बोगस अन्नपदार्थांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असल्याचे सांगून अन्न व औषध प्रशासन हे जागरुक आहे,

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे बनावट मावा आणि पेढा विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा (Raids on shops) टाकून सुमारे 54 हजार रुपयांचा बनावट मावा आणि इतर पदार्थ नष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ही कारवाई अचानकपणे केल्यामुळे दुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे, तर धार्मिक स्थळी मिळणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांमुळे भाविक आणि पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयातर्फे धार्मिक स्थळे व यात्रेच्या ठिकाणी उन्हाळी सुट्यांच्या पा र्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त व बोगस अन्नपदार्थांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असल्याचे सांगून अन्न व औषध प्रशासन हे जागरुक आहे,(Raids on shops selling fake mawa and pedas worth Rs 54,000 in Trimbakeshwar)

असे नाशिक विभागाचे सहआयुक्त सं. भा. नारागुडे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. प्रशासनाद्वारे गुरुवारी (दि. 18) त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी, गोपाळ कासार, यो गेश देशमुख, प्रमोद पाटील, तसेच श्रीमती अश्विनी पाटील यांनी अचानक छापे टाकून तपासणी केली असता त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या आसपासच्या भेसळयुक्त मावासदृश स्पेशल बर्फीपासून पेढा व कलाकंद बर्फी तयार करून विक्री होत असल्याचे धाडीमध्ये दिसून आले. या ठिकाणी मे. भोलेनाथ स्वीट्स, मेनरोड येथून एकूण 78 किलो कुंदा (लूज) किंमत रुपये 37 हजार 440 रुपये, नित्यानंद पेढा सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथून स्विट हलवा (शाम) 22 किलो किंमत रुपये 6 हजार 600 रुपये, हलवा (ग्वाल) 13 किलो किंमत रुपये 3 हजार 900 रुपये. मे. भोलेहर प्रसाद पेढा प्रसाद भंडार, उत्तर दरवाजा येथून हलवा (ग्वाल) 22 किलो, किंमत रुपये 6 हजार 600 रुपये, असा एकूण किंमत रुपये 54 हजार 440 रुपयांचा कुंदा व हलवा या नावाने भेसळयुक्त पेढे व कलाकंद बर्फी तयार करण्यासाठी वापरात येणारा मावासदृश अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तो नाशवंत मा ल असल्याने त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकून कचरा डेपोमध्ये नष्ट करण्यात आला आहे.

या प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात आले असून अहवाल आल्यावर कायद्यानुसार उल्लंघनाबाबत पुढील कार्यवाही घेण्यात येईल. ही कारवाईमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी गो. वि. कासार, योगेश देशमुख, पी. एस. पाटील, अ. उ. रासकर, श्रीमती ए. ए. पाटील, उ. रा. सूर्यवंशी, श्रीमती सा. सु. पटवर्धन, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी, धुळे येथील कि. हि. बाविस्कर व नंदुरबार येथील अन्न सुरक्षा अधिकारी, आ. भा . पवार यांनी सहभाग घेतला. सदर कारवाई नाशिक विभाग सहआयुक्त, सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न) उ. सी. लोहकरे व म. मो. सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आली. प्रशासनातर्फे सर्व जनतेस व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे, की भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात, तक्रार, तसेच काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरित टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी