29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्राईमनाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील शेतमजूर असणाऱ्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र त्यानंतर पतीने देखील जंगलात एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहेत. कुकडणे देशमुखनगर येथील ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उंबरठाण पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील कुकडणे देशमुखनगर सीमावर्ती भागात वैशाली अर्जुन पवार (२५) आणि अर्जुन श्‍यामल पवार (२५) हे पती-पत्नी शेतात राहत होते. पती अर्जुन पवार यांनी पत्नी वैशाली पवार यांचे चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत होती.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील शेतमजूर असणाऱ्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून (killed) केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र त्यानंतर पतीने देखील जंगलात एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहेत. कुकडणे देशमुखनगर येथील ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उंबरठाण पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील कुकडणे देशमुखनगर सीमावर्ती भागात वैशाली अर्जुन पवार (२५) आणि अर्जुन श्‍यामल पवार (२५) हे पती-पत्नी शेतात राहत होते. पती अर्जुन पवार यांनी पत्नी वैशाली पवार यांचे चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत होती. (Wife killed on suspicion of character in Surgana in Nashik district)

बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पती अर्जुनने पत्नी वैशाली घरात असताना तिचा गळा दाबून ठार केले. मात्र आपल्या हातून गैरकृत्य घडल्याचे लक्षात येताच अर्जुनने वनपट्ट्यातील एका सादड्याच्या झाडाला ओढणी आणि दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलीसपाटील मनोहर चौधरी यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, सोमनाथ कोदे यांच्या तक्रारीवरून मृत संशयित आरोपी पती अर्जुन पवारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मागे एकुलता सहा वर्षांचा मुलगा आहे. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर दोघांचेही मृतदेह मूळगावी गुजरातमध्ये पाठविण्यात आले. गुजरातमधील बिशोनिया गावी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजीत पाटील अधिक तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पवार पती-पत्नी हे देशमुख नगर या ठिकाणी शेतात मजुरीचे काम करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून भांडणे सुरू होती पती अर्जुन हा पत्नी वैशालीवर चारित्र्याचा संशय घेत भांडण करायचा आणि मारहाण देखील करत अशी माहिती स्थानिकांनी दिली. मात्र या भांडणातून पती अर्जुनने पत्नी वैशालीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली. मात्र हातून गैरकृत्य घडल्याचे लक्षात येताच पती अर्जुनने देखील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी