27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्राईमदुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे २३ लाख रुपये असे दुप्पट रकम करून देतो, असे आमिष दाखवून ७ लाखांच्या रोकडसह दोन वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने डांगसौंदाण्यातून (ता. बागलाण) अटक केली आहे. त्याच्या घरझडतीतून खेळण्यातल्या नोटांचे १५७ बंडल आढळले आहेत. हेच बंडल दाखवून तो समोरच्या व्यक्तीला आमिष दाखवून गंडा घालायचा.तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे २३ लाख रुपये असे दुप्पट रकम (double the amount) करून देतो, असे आमिष (luring ) दाखवून ७ लाखांच्या रोकडसह दोन वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने डांगसौंदाण्यातून (ता. बागलाण) अटक केली आहे. त्याच्या घरझडतीतून खेळण्यातल्या नोटांचे १५७ बंडल आढळले आहेत. हेच बंडल दाखवून तो समोरच्या व्यक्तीला आमिष दाखवून गंडा घालायचा.तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.(Suspect arrested from Dangsaundana for luring double the amount)

पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, ११ मार्च २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगरातील फिर्यादीला संशयित तेजस आणि त्याच्या साथीदारांनी ७ लाखांच्या बदल्यात २३ लाख रुपये करून देतो, असे आमिष दाखवून फिर्यादीकडील ७ लाख रुपये घेतले आणि त्यांच्याकडील बनावट नोटांचे बंडल दाखविले. ७ लाखांची रोकड हाती पडताच संशयितांनी पोबारा केला होता.

तेव्हापासून संशयित तेजस पसार होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे निरीक्षक मधुकर कड यांना संशयित तेजसची खबर मिळाली असता, पथकाचे उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ यांनी बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे गाठले. त्याठिकाणी सापळा रचून संशयित तेजस पळून जाण्याच्या तयारीत असताना, पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यास चौकशीसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी