32 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
Homeमनोरंजनबिग बॉस मराठी सीझन पाचवा महेश मांजरेकरांची जागा घेणार रितेश देशमुख

बिग बॉस मराठी सीझन पाचवा महेश मांजरेकरांची जागा घेणार रितेश देशमुख

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचा एक टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टीझरद्वारे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा होस्ट रितेश देशमुख असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महेश मांजरेकरांची जागा आता रितेश देशमुख घेणार असल्याने नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रा ला ज्या क्षणाची उत्सुकता होती अखेर तो क्षण जवळ आला आहे. कलर्स मराठी आणि वर 'बिग बॉस मराठी' चा पाचवा सीझन लवकरच सुरु होणार आहे. पण यावेळी बिग बॉसचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांच्याऐवजी अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.

बिग बॉस ( Bigg Boss) मराठीचा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचा एक टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टीझरद्वारे बिग बॉस ( Bigg Boss) मराठीच्या पाचव्या सीझनचा होस्ट रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महेश मांजरेकरांची (Mahesh Manjrekar) जागा आता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) घेणार असल्याने नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रा ला ज्या क्षणाची उत्सुकता होती अखेर तो क्षण जवळ आला आहे. कलर्स मराठी आणि वर ‘बिग बॉस ( Bigg Boss) मराठी’ चा पाचवा सीझन लवकरच सुरु होणार आहे. पण यावेळी बिग बॉसचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याऐवजी अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) करणार आहे.(Ritesh Deshmukh will replace Bigg Boss Marathi Mahesh Manjrekar)

सोशल मीडियावर नुकताच बिग बॉस मराठीचा एक व्हिडिओ कलर्स मराठीकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बिग बॉसचा डोळा तसेच सुपरस्टार रितेश देशमुख दिसत आहे. या नव्या सीझनच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी हे नवे सरप्राईज आहे. त्यामुळे टीझर व्हिडिओ बघितल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘बिग बॉस मराठी 5’ चा टीझर शेअर केला आहे. या टीझर व्हिडीओमध्ये प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखचा वेगळा अंदाज बघायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘मराठी मनोरंजनाचा ”BIGG BOSS”… सर्वांना ”वेड” लावायला येतोय…”लय भारी” होस्ट,सुपरस्टार रितेश देशमुख!! फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinemaवर’ असं लिहिण्यात आलं आहे. बिग बॉस हा शो हिंदीमध्ये खूप लोकप्रिय झाला. हिंदी बिग बॉसला मिळालेल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीतही सुरु करण्यात आला. “बिग बॉस मराठी” या कार्यक्रमालाही प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम महाराष्ट्रा च्या घराघरांत जाऊन पोहोचला. बिग बॉस मराठीचे आत्तापर्यंत चार सीझन झाले आहेत. मराठमोळी थीम असलेल्या बिग बॉसच्या चारही सीझनची प्रचंड चर्चा झाली. आता त्याच’बिग बॅास’ मराठीच्या नव्या सीझनची तयारी सुरु झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी