27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeक्राईमदेवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; बस 150 फूट दरीत कोसळली, 21 जणांचा...

देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; बस 150 फूट दरीत कोसळली, 21 जणांचा मृत्यू

देवदर्शनाला जात असताना भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे झाला आहे. भाविकांनी भरलेली बस थेट 150 फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात 21 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी जाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अखनूर परिसरातील चौकी चौरा येथे चुंगी वळणावर हा अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

देवदर्शनाला जात असताना भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे झाला आहे. भाविकांनी भरलेली बस (Bus falls ) थेट 150 फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, त्यात 21 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी जाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अखनूर परिसरातील चौकी चौरा येथे चुंगी वळणावर हा अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली बस (Bus falls ) थेट दरीत कोसळली. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Time is on the devotees who are going to see the deity; Bus falls into 150-foot gorge, 21 dead )

भाविकांनी भरलेली ही बस उत्तरप्रदेशातील हाथरस येथून आली होती. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात अनेक भाविक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमी भाविकांना उपचारासाठी अखनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाविकांना जम्मू शहरातील सरकारी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

चालकाला डुलकी लागल्याने अपघात?
जम्मू काश्मीरचे परिवहन आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, बस शिव खोरीच्या दिशेने जात होती. या परिसरात रस्ते, वळण खूपच सामान्य आहेत आणि अवघड रस्ता नाहीये. मात्र, तरी सुद्धा हा अपघात झाला. कदाचित बस चालकाला डुलकी लागली असेल आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा. बसने टर्न घेण्याच्या ऐवजी थेट दरीत कोसळली.

150 फूट खोल दरीत बस कोसळली
जम्मू काश्मीरचे परिवहन आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील चोकी चोरा क्षेत्रातील तांगली वळणावर हा अपघात झाला. बस थेट 150 फूट खोल दरीत कोसळली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी दाव घेतली आणि मदत-बचावकार्य सुरू केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी