35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे सरकारकडून बदल्यांचा बाजार, कायदा बसविला धाब्यावर; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

ठाकरे सरकारकडून बदल्यांचा बाजार, कायदा बसविला धाब्यावर; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

टीम लय भारी

मुंबई- अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या वाढीव बदल्या मुख्यमंत्र्यांनी थांबवाव्या अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Chandrakant patil requested CM for stay on transfer of government officers and servants )

राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती, पुढ्यात ठाकलेला तिसऱ्या लाटेचा धोका, नुकतीच झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे उदभवलेली पूरपरिस्थिती अशा काळात मुख्यमंत्र्यांनी कायद्याला धरून चालावे अशा आशयाचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी लिहिले आहे.

पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याकडून कंत्राटदारांची छळवणूक!

अजित पवारांच्या पुतणीचे आज लग्न, विवाहस्थळ बंगळुरू !

पत्रात ते पुढे म्हणतात, महाराष्ट्रावर एकामागून एक कोसळणाऱ्या संकटांचा विचार करून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव बदल्या मुख्यमंत्र्यांनी टाळाव्यात. मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या वाढवून पंचवीस टक्के इतक्या केल्या आहेत.

बदल्यांची मर्यादा वाढवून 25% केल्यानंतर विशेष कारणास्तव 10% बदल्यांनाही परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कारणास्तव 2005 मध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर 30 टक्क्यांवर बदल्या होऊ नयेत असा कायदा झाला होता. मुख्यमंत्र्यांनी 35% बदल्या करण्यास परवानगी दिल्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मोठ्या प्रमाणात बदल्या होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बदल्या करण्याचा कोटा वाढवल्यामुळे अधिकाऱ्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे व बदल्या करण्याचा बाजार मांडला आहे. याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांचीच आहे.

‘ओठांवर वेदना होतात म्हणून ‘देवेंद्रां’चे नाव हातावर गोंदले’ – नरेंद्र पाटील

Maharashtra Rains LIVE: CM Uddhav takes stock of flood-hit Chiplun; 150 NDRF teams deployed

राज्यातील संकटे अजून पूर्णपणे निवळली नसताना बदल्या झाल्यास त्याचे त्याचे पडसाद नागरिकांच्या जीवनावर होऊ शकतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व पुरग्रस्तांसाठी ज्या योजना राबवण्यात येत आहेत. त्यावर या होणाऱ्या बदल्यांचा मोठा परिणाम होऊ शकतो. कोरोना परिस्थितीमुळे बदल्या टाळाव्यात असे धोरण सरकारने गेल्या वर्षी ठरविले होते. या वर्षीही ते लागू करावे अशीही मागणी चंद्रकांत पाटील यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.

Chandrakant

चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी