33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीय'मोदी सरकार'चे पितळ उघडे पाडण्यासाठी युवा सेनेचा 'करेक्ट कार्यक्रम'

‘मोदी सरकार’चे पितळ उघडे पाडण्यासाठी युवा सेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’

टीम लय भारी

मुंबई : देशभरात वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं आहे. इंधनाचे दरही गगनाला भिडले आहेतच. याशिवाय भाजीपाल्याचेही दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड पडले आहे. या महागाईच्या भडक्याविरोधात विरोधी पक्ष ठिकठिकाणी निदर्शने करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (Shiv Sena) युवासेनेने महागाईविरोधात आंदोलन छेडले आहे.(Shiv Sena’s youth wing agitation against inflation)

युवासेनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व शहरात उद्या म्हणजे 3 एप्रिलला युवासेनेचे कार्यकर्ते महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरत अनोखा आनंदसोहळा साजरा करणार आहेत. त्यामुळे अभूतपूर्व इंधन दरवाढ साजरी करण्याकरीता ‘फक्त बघू नका,तर सामील व्हा असं आवाहन युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केले आहे.

'मोदी सरकार'चे पितळ उघडे पाडण्यासाठी युवा सेनेचा 'करेक्ट कार्यक्रम'

महागाई विरोधात ‘थाली बजाओ’ आंदोलन

भाजपा सत्तेत आली. परंतु आज पेट्रोल-डिझेलनं शंभरी ओलांडली. गॅसचे दर वाढले. अत्यावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. कोरोनाच्या काळात युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनता विचारत आहे असं युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई म्हणाले . अच्छे दिनासाठी भाजपाचं अभिनंदन करण्यासाठी युवासेनेच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात 3 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता थाली बजाओ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी भाजपाने थाळ्या वाजवून कोरोनाला पळवून लावलं होतं. तशाच रितीने थाळी वाजवून भाजपा महागाईला पळवून लावेल ही अपेक्षा ठेवत शिवसेनेच्या (Shiv Sena) युवासेनेने हे आंदोलन छेडले आहे.


हे सुद्धा वाचा –

Rahul Gandhi leads Congress’ nation-wide protest against inflation, fuel price hike

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार ? , नाना पटोलेंचा सवाल

महागाई विरोधात बाळासाहेब थोरात यांचा आक्रमक पवित्रा

दिल्लीत महिला कॉंग्रेसचे महागाई विरोधात जोरदार आंदोलन, केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी