27 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeराजकीयईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावई अटकेत

ईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावई अटकेत

टीम लय भारी

मुंबई  :-  ईडी राज्यात मोठ्या वेगाने सक्रीय झाली आहे. ईडीने राष्ट्रवादीभोवती आपला फास आवळण्याचा धडाका लावला आहे. आधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना टार्गेट केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना टार्गेट करण्यात आले आहे. ईडीचा फेरा खडसे परिवाराच्या पाठीमागे लागला आहे (ED turn is behind the Eknath Khadse family).

भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने अटक केली आहे (Eknath Khadse son-in-law Girish Chaudhary has been arrested by the ED last night). यामुळे एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ऑपरेशन लोटस राज्यात पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत यातून मिळू लागले आहेत.

दिलीपकुमार यांची वयाच्या 98 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

प्रवीण दरेकरांची मविआ सरकार टीका; हा फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पद गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला एकनाथ खडसे सामोरे गेले होते. एकनाथ खडसे यांची मुलगी शारदा यांना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. काल दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली. गिरीश चौधरी यांना ईडीने रात्री अटक केल्याचे आज सकाळी जाहीर केले. यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत (Eknath Khadse problems have increased).

ED turn is behind the Eknath Khadse family
एकनाथ खडसे

बाळासाहेब थोरातांनी सभागृहात मांडली शेतकरी हिताची तीन विधेयके

NCP Leader Eknath Khadse’s Son-In-Law Arrested In Money Laundering Case

झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. मात्र, पदाचा गैरवापर करून एकनाथ खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची होती असे नंतर समोर आले.

या कारवाईवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतरची ही भाजपाची प्रतिक्रिया आहे. असे काहीतरी होणारच होते. कारण ईडी ही भाजपाची प्रेयसी आहे. त्यांचा विरोधकांना नमविण्यासाठी वापर केला जातो. सीडी आता नाथाभाऊ समोर आणतील, त्याची वाट पाहूयात, असे सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी