29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeसिनेमादिलीपकुमार यांची वयाच्या 98 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

दिलीपकुमार यांची वयाच्या 98 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

टीम लय भारी

मुंबई :- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे आज निधन झाले आहे. दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला (Dilip Kumar passed away at the age of 98).

दिलीपकुमार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. दिलीप कुमार यांना 29 जूनला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी (५ जुलै) रोजी त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता.

प्रवीण दरेकरांची मविआ सरकार टीका; हा फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार

बाळासाहेब थोरातांनी सभागृहात मांडली शेतकरी हिताची तीन विधेयके

पण पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांच्या निधनाच्या अनेक वेळा अफवा आल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो या निधनाचे वृत्त फेटाळत त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचे सांगत होत्या. आजची सकाळ दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी वाईट उगवली. आज सकाळी 7:30 वाजता दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला (Dilip Kumar breathed his last at 7:30 this morning).

Dilip Kumar passed away at the age of 98
दिलीप कुमार आणि सायरा बानो

दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील. आज सांयकाळी 5 वाजता सांताक्रुझ येथील जुहू कब्रिस्तान मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत (He will be buried at Juhu Cemetery in Santa Cruz at 5 p.m.).

मंत्री अशोक चव्हाणांचा भाजपवर वर्मी घाव

Dilip Kumar dies at 98, LIVE UPDATES: Dilip Kumar to get state funeral

दिलीप कुमार यांनी 1944 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. बॉम्बे टॉकिजनं 1944 साली निर्माण केलेल्या ज्वार भट्टा सिनेमातून दिलीपकुमार यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केले. ‘मिलन’ हा त्यांचा पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. त्या नंतर या कलाकाराने त्याच्या अभिनायने अशी काही जादू केली की त्यांच्या अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे सुपरहिट चित्रपट दिलीपकुमार यांनी चित्रपटसृष्टीला आणि आपल्या चाहत्यांना दिले आहेत. तर 1998 मध्ये ‘किला’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांना 8 वेळा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. केंद्र  सरकारने 1994 साली त्यांना सिनेसृष्टीतील प्रदीर्घ कामगिरीमुळे “दादासाहेब फाळके पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. तर, 1988 मध्ये त्यांना पाकिस्तानने “निशाण-ए-पाकिस्तान” हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

अशा ह्या बहुगुणी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा जाण्याने बॉलीवूड मध्ये सर्वत्र शोककळा पसरली आहे. अनेक ज्येष्ठ कलाकार, नेते, अणि संपूर्ण भारतभर आज हया अभिनेत्याच्या जाण्याने दुःख पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर वरून शोक व्यक्त केला आहे.. “सिनेसृष्टीतील लेजेंड म्हणुन दिलीप कुमार नेहमीच आपल्या लक्षात राहतील. त्यांच्या निधनाने देशातील सांस्कृतिक जगाचे मोठे नुकसान झाले आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी