28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयब्राह्मण खरंच गांधींविरोधी आहेत का ?

ब्राह्मण खरंच गांधींविरोधी आहेत का ?

मी ज्या विषयावर बोलणार आहे, तो तसा नाजूकच आहे. गेल्या कित्येक दशकांपासून असं भासवलं जातंय की, ब्राह्मण समाज हा महात्मा गांधींच्या विरोधात आहे किंवा होता. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे. ब्राह्मण आणि महात्मा गांधी यांच्यात कसं नातं होतं, यावर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल फडके यांनी एक लेख लिहिलेला आहे. आम्ही, म्हणजेच ‘लय भारी’नं एक विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे. ‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ असं या विशेषांकाचं नाव आहे. त्यात प्रफुल्ल फडके सरांनी त्यांच्या निरीक्षणातून अतिशय अभ्यासू असे मुद्दे मांडलेले आहेत. प्रफुल्ल फडके म्हणतात की, कोणा एका नथुराम गोडसेनं महात्मा गांधींची हत्या केली.

मी ज्या विषयावर बोलणार आहे, तो तसा नाजूकच आहे. गेल्या कित्येक दशकांपासून असं भासवलं जातंय की, ब्राह्मण समाज हा महात्मा गांधींच्या विरोधात आहे किंवा होता. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे. ब्राह्मण आणि महात्मा गांधी (Relation between mahatma Gandhi and Brahman) यांच्यात कसं नातं होतं, यावर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल फडके यांनी एक लेख लिहिलेला आहे. आम्ही, म्हणजेच ‘लय भारी’नं एक विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे. ‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ असं या विशेषांकाचं नाव आहे. त्यात प्रफुल्ल फडके सरांनी त्यांच्या निरीक्षणातून अतिशय अभ्यासू असे मुद्दे मांडलेले आहेत. प्रफुल्ल फडके म्हणतात की, कोणा एका नथुराम गोडसेनं महात्मा गांधींची हत्या केली. त्यामुळं दंगली उसळल्या. नथुराम गोडसे ब्राह्मण समाजातील होता म्हणून समस्त ब्राह्मणांना दोषी मानून जाळपोळ झाली. अनेक निष्पाप ब्राह्मणांना देशोधडीला लावले गेले. हा झाला इतिहास. अर्थात त्यामुळं असा अर्थ होत नाही की, ब्राह्मण समाज नथुरामप्रेमी झाला आणि गांधीद्वेष करू लागला. उलट नथुराममुळे आपली ही अवस्था झाली म्हणून नथुरामचा तिरस्कार गांधीवादी नेते, काँग्रेस जेवढा करत नाही तेवढा तिरस्कार ब्राह्मणांकडून केला जातो. जे नथुरामचं समर्थन करतात त्यांना ना गांधी कळाले ना नथुराम. म्हणूनच महात्मा गांधींचे विचार काय होते आणि त्यावर कोणाचे काय आक्षेप होते याचाही थोडा विचार करावा लागेल. हल्लेखोर, दहशतवादी, अतिरेकी याला ना धर्म असतो ना जात असते. त्याची ओळख ही दहशतवादी, मारेकरी, खुनी अशीच असते. गांधी हत्येनंतर सहा वर्षांनी एक हिंदी चित्रपट आला होता. ‘जागृती’ हे त्या चित्रपटाचं नाव. हेमंतकुमार यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं. अभी भट्टाचार्य यांच्यासह अनेक बंगाली कलाकार त्यात होते. पण या प्रचंड गाजलेल्या चित्रपटातील एक गीत दरवर्षी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला वाजवलं जातं. राष्ट्रीय सणांना सुद्धा वाजवलं जातं. ते गाणे म्हणजे, ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल.’ हे गाणं वरकरणी देशभक्ती गीत वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात दुही माजवणारे आहे, असा फडके सरांनी त्यांच्या या लेखात दावा केलाय. ते पुढं म्हणतात. या गाण्याच्या पार्श्वभूमीवर गांधींविरोधात माथी भडकवणारी पार्श्वभूमी तयार झाली. बिना खड्ग, बिना ढाल असं खरंच स्वातंत्र्य मिळाल का ? फक्त महात्मा गांधींमुळच स्वातंत्र्य मिळालं का ? उपोषण, सत्याग्रह करून स्वातंत्र्य मिळालं का ? मग देशासाठी रक्त सांडणारे, हसत हसत फासावर जाणारे ते लोक कोणासाठी लढले? स्वातंत्र्यासाठी त्यांचं काहीच योगदान नाही का ? ब्रिटिशांच्या गोळ्या छातीवर झेलून मरणारे, रक्त सांडणारे कोण होते ? जालियनवाला बागेत मृत्युमुखी पडणारे कोण होते? हे सर्व जण स्वातंत्र्यासाठीच लढले होत ना? मग खड्ग बिना ढाल स्वातंत्र्य मिळालं हे काय आपण म्हणू शकतो? या हजारो लोकांनी सांडलेल्या रक्ताला काहीच किंमत नव्हती का ? यात फासावर जाणारे कित्येक जण कोवळे तरुण होते. लाला लजपतराय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, उधमसिंग यांच्यापासून ते उमाजी नाईक यांच्यापर्यंत फासावर गेलेले नेते देशासाठी गेले होते. ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठीच त्यांनी बलिदान दिलं होतं. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सोसलेले हाल हे कसं विसरता येतील ? त्यांचं योगदान विसरून चालेल का ? १८५७चा उठाव कसा विसरून चालेल ? त्यामुळं हजारो, लाखो लोकांनी रक्त सांडलं त्याकडं दुर्लक्ष करायचं आणि महात्मा गांधींच्या उपोषणानं, सत्याग्रहानं रक्त न सांडता, हातात शस्त्र न घेता ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं हा खोटा इतिहास लादणं चुकीचं आहे. त्यासाठी चित्रपटाचा प्रभावी वापर करण्यात आला. इथूनच समाजात दुही माजवण्याचं काम सुरू झालं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी