29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeएज्युकेशनDU UG Admission 2022 : CSAS पहिली वाटप यादीची तारिख पुढे ठकलली;...

DU UG Admission 2022 : CSAS पहिली वाटप यादीची तारिख पुढे ठकलली; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी!

दिल्ली विद्यापीठाने (DU) कॉमन सीट ऍलोकेशन सिस्टम (CSAS) ची पहिली वाटप यादी एका दिवसाने पुढे ढकलली आहे. DU प्रवेशाची CSAS पहिली वाटप यादी 18 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता प्रसिद्ध होणार होती.

दिल्ली विद्यापीठाने (DU) कॉमन सीट ऍलोकेशन सिस्टम (CSAS) ची पहिली वाटप यादी एका दिवसाने पुढे ढकलली आहे. DU प्रवेशाची CSAS पहिली वाटप यादी 18 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता प्रसिद्ध होणार होती, ती आता 19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. DU प्रवेश 2022 CSAS UG पहिल्या टप्प्यातील वाटप यादी admission.uod.ac.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. DU UG राउंड-1 गुणवत्ता यादी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरताना निवडलेले अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांच्या संयोजनाच्या आधारे तयार केली जाईल. मात्र, विद्यापीठाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांमध्या नाराजी निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

सेंट स्टीफन कॉलेजच्या प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे
वास्तविक, प्रवेशाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात डीयूच्या सेंट स्टीफन्स कॉलेजच्या याचिकेवर बुधवारी (19 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने महाविद्यालयाला DU ने तयार केलेल्या प्रवेश धोरणाचे पालन करण्यास सांगितले आहे ज्यानुसार कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) 2022 चा स्कोअर 100 असायला हवा, तर त्याच्या UG अभ्यासक्रमांमध्ये गैर-अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना टक्केवारीचे वेटेज द्यावे लागेल. तथापि, सेंट स्टीफन्स कॉलेज प्रत्येक श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी CUET ला फक्त 85% वेटेज आणि मुलाखतीसाठी 15% वेटेज देऊ इच्छित आहे.

हे सुद्धा वाचा

Asia Cup : आशिया चषक 2023 पाकिस्तानात? मोठी अपडेट आली समोर

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये हॅलिकॉप्टर क्रॅश! दर्शनासाठी गेलेल्या 7 भाविकांचा मृत्यू

Ajit Pawar : अजितदादा खवळले, भाजपवर उखडले !

वेळापत्रक बदलू शकते
जे विद्यार्थी DU UG CSAS मेरिट लिस्टमध्ये समाधानी आहेत त्यांना त्यांची स्वीकृती सबमिट करावी लागेल. यापूर्वी स्वीकृती सादर करण्याची तारीख 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान होती, परंतु आता, जेव्हा CSAS गुणवत्ता यादीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तेव्हा विद्यापीठ नियोजित तारखा देखील पुढे ढकलू शकते. DU UG विद्यार्थ्यांनी स्वीकृती सबमिट केल्यानंतर, महाविद्यालये ऑनलाइन अर्ज सत्यापित आणि मंजूर करतील. याशिवाय, आम्ही तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर 2022 होती. विद्यापीठ कदाचित यातही बदल करू शकेल.

दरम्यान, या सर्व प्रकरणात विद्यापीठाने तारखआंमध्ये बदल केल्यास विद्यार्थ्यांची फरफट होणे निश्चित आहे. विशेष म्हणजे अनेकदा विद्यापीठाच्या वेळापत्रकावर आनेक विद्यार्थी इतर कामाचे नियोजन करून ठेवत असतात. मात्र, अगदी एन वेळेस विद्यापीठांच्या वेळापत्रकात होणारा बदल विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम करत असल्याचे पाहायला मिळत असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी