31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशनJobs Updates : UPSC मार्फत 327 पदांची भरती

Jobs Updates : UPSC मार्फत 327 पदांची भरती

पुर्वीप्रमाणे सरकारी नोकऱ्यांपेक्षा खाजगी नोकऱ्यांचे जाळे सध्या अफाट पसरलेले आहे तरी सुद्धा अजूनही जनसामान्यान सरकारी नोकरीच्या नावाने सुखावतात. खाजगी नोकऱ्यांमध्ये अनिश्चितता फार असल्याने सरकारी नोकरीचाच पर्यायाने अनेकांना चांगला वाटतो, त्यामुळे सरकारकडून राबवलेली भरती प्रक्रिया निश्चितच एक सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रशासकीय सेवेत जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते, सगळ्यांनाच याची संधी मिळतेच असे नाही परंतु ज्यांना कोणाला मिळते ते मात्र स्वर्ग मिळाल्याचा आनंद व्यक्त करतात. खाजगी सेवेपेक्षा सरकारी सेवेत काम करायला मिळणे याला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त होत असते त्यामुळे आपल्या बाब्याने सरकारी नोकरीच करावी असेच कायम प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटत राहते. या सरकारी व्यवस्थेत युपीएससी आणि एमपीएससीच्या यंत्रणांना एक विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे, त्याचा ग्लॅमरच काहीतरी वेगळा असल्याचे पाहायला मिळतो आणि जर याच ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी मिळाली तर, तुम्ही बरोबर ऐकलंत UPSC मार्फत लवकरत 327 पदांची भरती करण्यात येणार असून याबाबची इत्तंभूत माहिती युपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत काही पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या आयोगाअंतर्गत अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 या पदांसाठी एकूण 327 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला सरकारी नोकरीची आवड असले तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : शाळा – कॉलेजांत नशाबाजीचा नवा प्रकार, मुख्यमंत्र्यांकडे आली तक्रार!

Hospital Fire Incident: पीडब्लूडी विभागाला विचारात न घेतल्यामुळे रुग्णालयात आगी वाढत आहेत

Smartphone Offers Update : अवघ्या 539 रूपयांत मिळणार स्मार्टफोन!

सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी 200 रुपये शुल्क आकारले जाणार असून या पदांसाठी वयोमर्यादा 21 ते 30 अशी ठेवण्यात आली आहे. सदर पदांसाठी आवश्यक ती शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. या संपुर्ण रिक्त पदांबाबतची माहिती तुम्हाला युपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 अशी देण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधीच या निमित्ताने अनेकांना मिळणार आहे. पुर्वीप्रमाणे सरकारी नोकऱ्यांपेक्षा खाजगी नोकऱ्यांचे जाळे सध्या अफाट पसरलेले आहे तरी सुद्धा अजूनही जनसामान्यान सरकारी नोकरीच्या नावाने सुखावतात. खाजगी नोकऱ्यांमध्ये अनिश्चितता फार असल्याने सरकारी नोकरीचाच पर्यायाने अनेकांना चांगला वाटतो, त्यामुळे सरकारकडून राबवलेली भरती प्रक्रिया निश्चितच एक सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी