33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यEknath Shinde : शाळा - कॉलेजांत नशाबाजीचा नवा प्रकार, मुख्यमंत्र्यांकडे आली तक्रार!

Eknath Shinde : शाळा – कॉलेजांत नशाबाजीचा नवा प्रकार, मुख्यमंत्र्यांकडे आली तक्रार!

व्यसन ही गोष्ट कायमच धोकादायक परंतु त्यावर योग्य मार्गदर्शन कसे मिळणार आणि त्याला लगाम कसा लागणार हे लक्षात घेऊनच पावले टाकणे म्हत्त्वाचे ठरणार आहे. 

तरुणाईत वाढणारी व्यसनाधीनता सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. चक्क शाळा आणि काॅलेजसमधून असे धक्कादायक प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत त्यामुळे शैक्षणिक संस्था नशाबाजीचा अड्डा बनत चाललाय का असा प्रश्न या निमित्ताने समोर येऊ लागला आहे. या संदर्भातील तक्रारीचे एक पत्र उदय मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपुर्द करीत एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून यात लक्ष घाला अशी विनंती केली आहे, शिवाय तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्या या व्यसनापासून वाचवणे हे आपले कर्तव्य व सामाजिक दायित्व आहे असे म्हणून तरुणांमध्ये झपाट्याने वाढत चाललेल्या या नशाबाजीकडे मोरे यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले आहे.

वाढणारी व्यसनाधीनता यावर अनेक चर्चासत्रांच्या माध्यमातून लक्ष वेधले जाते, त्यावर उपाययोजना शोधल्या जातात नंतर मात्र विषय जैसे थेवरच ताटकळत राहतो. आता यामध्ये तरुणांचा सुद्धा सहभाग वाढू लागल्याने ही चिंता आणखी वाढली आहे. केवळ महाविद्यालयातील विद्यार्थी नव्हे तर शाळेतील विद्यार्थी सुद्धा नशेचे वेगवेगळे प्रकार करताना दिसत आहेत. यावरच आवाज उठवत उदय नरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे आणि सद्यस्थितीचा लेखाजोखाच या पत्राद्वारे त्यांनी मांडला आहे. हल्लीच्या भाषेतील ‘कूल’ या शब्दाला नशेबाजी कशी कारणीभूत ठरत आहे हे उदाहरणादाखल नरे यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा…

Hospital Fire Incident: पीडब्लूडी विभागाला विचारात न घेतल्यामुळे रुग्णालयात आगी वाढत आहेत

Smartphone Offers Update : अवघ्या 539 रूपयांत मिळणार स्मार्टफोन!

‘Sairat’ fame Suraj Pawar Cheating case : ‘सैराट’ फेम सूरज पवार अडचणीत ; फसवणुकीच्या प्रकरणात होऊ शकते अटक

पत्रात उदय नरे लिहितात, सध्या सिगारेटची जागा आता ईसिगारेटनी घेतली. वेब सिगारेट नाव नवीन नसले तरी अनेक शाळांमध्ये व महाविद्यालयीन परिसरात या वेबची लाट आली आहे. सातशे पन्नास रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत असलेली ही वेब सिगारेट शाळा महाविद्यालयातील शिक्षकांची डोकेदुखी बनत आहे. यावेळी नरे यांनी सिगारेट आणि ई – सिगारेट यांच्यातील फरक सुद्धा सांगितला आहे. ते म्हणतात, ज्या सिगारेटचा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजेच ई सिगारेट. तंबाखूजन्य सिगारेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो.

उदय नरे पुढे लिहितात, अशी व्यसने करणारी मुले ओळखण कठीण कारण इतर नशेप्रमाणे कोणत्याही प्रकारची चिन्हे दिसत नसल्याने विद्यार्थ्यांना हुटकून काढणे दुरास्पद आहे. दरम्यान, शाळा महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून याबाबत पोलिस तक्रार नाही व कुठेच वाच्यता नाही. अनेक प्रकरणे दाबून टाकली जातात. दुर्दैवाने तरुण मुले, मुलीही या व्यसनात गुरफटत आहेत. सर्व साधारणपणे हुक्क्या प्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सची जत्रा वेब सिगारेट मध्ये असते असे या मुलांच्या बोलण्यातून जाणवते. परंतु द्रव्यरुपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धुम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धुम्रपान असे म्हटले जाते असे नरेंनी तरुणांच्या व्यसनाधीता स्पष्ट केली आहे.

शरीराला अपायकारक असलेली ही द्रव्ये आमच्या तरुणपिढीची शरीर व मने खोकली करत आहेत व त्याचबरोबर आपल्या देशातील तरुण पीढी बरबाद होत आहे. या वेबचा धूर वेळीच रोखला नाही तर भविष्यात शाळा, महाविद्यालये ही वेबचा अड्डा बनतील नवनिर्माण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी आपली सेना वाचवण्यासाठी आजच्या तरुणाईला वाचवले पाहिजे असे म्हणून उदय नरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनवणी केली आहे. व्यसन ही गोष्ट कायमच धोकादायक परंतु त्यावर योग्य मार्गदर्शन कसे मिळणार आणि त्याला लगाम कसा लागणार हे लक्षात घेऊनच पावले टाकणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी