33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमंत्रालयUday Samant : अनिल देशमुखांचे पणवती कार्यालय उदय सामंतांच्या नशिबी!

Uday Samant : अनिल देशमुखांचे पणवती कार्यालय उदय सामंतांच्या नशिबी!

अनिल देशमुखांच्या कार्यालयात पाऊल ठेवताच ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने’ (मॅट) सामंत यांना दणका दिला आहे. अनेक मंत्र्यांनी हे कार्यालय नको म्हणून विरोध केला होता, परंतु हे पणवती कार्यालय सामंत यांच्या नशिबी आलंय.

अनिल देशमुख सध्या तुरूंगात आहेत. तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांचा आरोप केला, अन् त्यानंतर देशमुख यांची रवानगी तुरूंगात झाली. त्यानंतर जवळपास वर्षभर अनिल देशमुख यांचे मंत्रालयातील कार्यालय बंद होते. आता हे कार्यालय उघडण्यात आले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांना हे कार्यालय देण्यात आले आहे. सामंत यांनी कार्यालयातून आपला कारभार सुरू सुद्धा केला आहे. गणपतीची पुजा करून सामंत यांनी नुकताच या कार्यालयात प्रवेश केला. पण अनेक मंत्र्यांनी हे कार्यालय नको म्हणून विरोध केला होता. सरतशेवटी देशमुखांचे हे पणवती कार्यालय सामंत यांच्या नशिबी आले आहे.

खरेतर, उदय सामंत हे ‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होते. त्यांना पाचव्या माळ्यावर अडीच वर्षांपूर्वी कार्यालय मिळाले होते. त्या कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बराच काळ तोडफोड सुरू होती. जवळपास वर्षभर ‘तोडो-फोडो-जोडो’ केल्यानंतर सामंत यांच्या त्या कार्यालयाला लखाकी व चकाकी आली होती. या नव्या कोऱ्या करकरीत कार्यालयाचा सामंत व त्यांच्या अधिकाऱ्यांनी – कर्मचाऱ्यांनी पुरेपुर उपभोग सुद्धा घेतला नव्हता. जेमतेम वर्षभरच त्या कार्यालयात त्यांचे बस्तान होते.

हे सुद्धा वाचा…

Jobs Updates : UPSC मार्फत 327 पदांची भरती

Eknath Shinde : शाळा – कॉलेजांत नशाबाजीचा नवा प्रकार, मुख्यमंत्र्यांकडे आली तक्रार!

Hospital Fire Incident: पीडब्लूडी विभागाला विचारात न घेतल्यामुळे रुग्णालयात आगी वाढत आहेत

Uday Samant : अनिल देशमुखांचे पणवती कार्यालय उदय सामंतांच्या नशिबी!

त्यानंतर भाजपप्रणीत एकनाथ शिंदे सरकार सत्तेत आले. नव्या सरकारमध्ये उदय सामंत यांना उद्योग खाते मिळाले. सरकार बदलले, मंत्रीपद बदलले तरी दालन बदलण्याची काहीच गरज नव्हती. दीपक केसरकर व एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेच्या कोणत्याच मंत्र्यांचे बंगले व कार्यालये बदलण्याची आवश्यकता नव्हती. सामान्य प्रशासन विभाग व मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जुन्या मंत्र्यांचीही कार्यालये बदलून दिली. त्यात उदय सामंत यांचे सुद्धा कार्यालय बदलले.

अनिल देशमुखांच्या कार्यालयात पाऊल ठेवताच उदय सामंतांवर न्यायालय कोपले

धर्मभोळेपणा व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विद्यमान सरकार सत्तेत आहे. त्यामुळे जप, तप, भक्ती, देव – धर्म, ज्योतिष याला या सरकारमधील मंत्री अग्रक्रम देतात. त्यामुळे अनिल देशमुख यांचे पणवती कार्यालय नको म्हणून अनेक मंत्र्यांनी विरोध केला होता. उदय सामंत यांच्या नशिबात मात्र नेमके हेच कार्यालय आले आहे.

या कार्यालयात पाऊल ठेवताच ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने’ (मॅट) सामंत यांना दणका दिला आहे. सामंत यांनी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्या बदल्या दोन दिवसांपूर्वी मॅटने रद्द केल्या आहेत. अनिल देशमुख यांनी वापरलेल्या कार्यालयात कारभार सुरू केल्यानंतरच सामंत यांच्यावर न्यायालय कोपल्याचा योगायोग जुळून आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी