25 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
Homeएज्युकेशनमुंबई विद्यापीठाने जाहीर केल्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा 

मुंबई विद्यापीठाने जाहीर केल्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा 

मुंबई विद्यापीठाने द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी २०२४ मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये चारही विद्याशाखाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. (Mumbai University has announced the dates of Winter Session Exams)

मुंबई: मुंबई विद्यापीठाने द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी २०२४ मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये चारही विद्याशाखाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. (Mumbai University has announced the dates of Winter Session Exams)

हिवाळी सत्र २०२४ साठी आयोजित होणाऱ्या या परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युरन्स, अकॉऊन्टींग अँड फायनान्स आणि बीएमएस सत्र ५ च्या परीक्षा या २३ ऑक्टोबर २०२४ पासून आयोजित केल्या जाणार आहेत. (Mumbai University has announced the dates of Winter Session Exams)

डॉ. प्रसाद कारंडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा कार्यभार स्वीकारला

तृतीय वर्ष बीए सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणार आहेत. तर एलएलबी ( ३ वर्षीय) सत्र ५ आणि एलएलबी ( ५ वर्षीय) सत्र ९ ची परीक्षा १९ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित होणार आहे.  (Mumbai University has announced the dates of Winter Session Exams)

याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील तृतीय वर्ष बीएस्सी, बीएस्सी ( संगणक शास्त्र), (जैवतंत्रज्ञान), (माहिती तंत्रज्ञान), (फॉरेन्सिक) आणि (डेटा सायन्स) सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून आयोजित केल्या जातील.  (Mumbai University has announced the dates of Winter Session Exams)

यासह पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इंजिनीअरींग, आर्कीटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर आगाऊ वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Mumbai University has announced the dates of Winter Session Exams)

देशातील आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी मुंबई विद्यापीठाने घेतला पुढाकार

विद्यापीठाने परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे दाखल करावयाच्या अर्जाचा कालावधी आणि परीक्षा शुल्क विनाविलंब भरण्याचा कालावधीही सोबतच्या परिपत्रकानुसार निर्गमित केला आहे. याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी दिलेल्या कालावधीतच परीक्षा अर्ज आणि शुल्क भरण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आवाहनही त्यांनी केले. (Mumbai University has announced the dates of Winter Session Exams)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी