33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeएज्युकेशनमुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाची भयंकर दुर्दशा, हजारो पुस्तकं खराब

मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाची भयंकर दुर्दशा, हजारो पुस्तकं खराब

टीम लय भारी

मुंबई : मुंबईच्या कलिना विद्यापीठात ग्रंथालयाची दुर्दशा पाहिली असता, मागील साठ-सत्तर वर्षांपासून जपलेल्या दुर्मिळ पुस्तकांचा विद्यापीठाच्या ग्रंथालयतील खजिना पूर्णपणे खराब झालाय आणि वाळवीग्रस्त झालाय. तर अनेक पुस्तकं रद्दीत जमा करण्याच्या वेळ आलीये(Mumbai University library, Terrible plight of books).

ग्रंथालयातील मराठी भाषा विभाग हा मागील चार वर्षापासून पूर्णपणे बंद होता या मराठी पुस्तकांची अवस्था सुद्धा इतर पुस्तकाप्रमाणेच झालीये. यावर युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी विद्यापीठात ग्रंथालयाची दुरावस्था पाहून पुस्तकांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे सांगितले. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून त्या पत्रात, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने ग्रंथालयाचे सद्यस्थिती ग्रंथालयांमध्ये असलेल्या पुस्तकांच्या संदर्भात खुलासा केला आहे.

विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची इमारत ही १९७५ ला तयार करण्यात आली होती. या ज्ञान स्त्रोत केंद्राची (विद्यापीठ ग्रंथालय) ग्रंथ संपदा ७,८०,००० एवढी आहे. या ग्रंथालयात काही देणगीदारांनी त्यांच्याकडे जागा नसल्याने व त्यांच्या उपयोगाची नसलेली अनेक ग्रंथ, वर्तमानपत्रे देणगी म्हणून दिलेली होती. तसेच काही पुस्तके विक्री अभावीही मोठ्या प्रमाणात या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत. मात्र या पुस्तकांचे पुन्हा नव्यनेत रोबोटिक स्कॅनरद्वारे नवीन प्रत तयार करण्यात येईल असे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा 

अनुसूचित जातींच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

मुंबई विद्यापीठातील १७८ महाविद्यालयांना प्राचार्यच नाहीत

Mumbai University’s Jawaharlal Nehru Library in shambles

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी