26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeएज्युकेशनविद्यार्थ्यांनो, तुमच्या आवडीनुसारच कोर्स निवडा !

विद्यार्थ्यांनो, तुमच्या आवडीनुसारच कोर्स निवडा !

लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी अॅटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची मुलाखत घेतली आहे. डॉ.राजन हे मुंबई विद्यापीठ तसेच यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू असून उच्च तंत्रशिक्षण याविषयीचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे सध्या सर्वच पालक आणि विद्यार्थी आता पुढे काय या प्रश्नाला घेउन चिंतेत दिसत आहेत(Students, choose the course according to your interest!). आता शिक्षणाचा एकूण विचार करता विद्यार्थ्यांना अनेक वाटा मोकळ्या असून त्यांना त्यांची योग्य माहिती आणि त्याविषयीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी अॅटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची मुलाखत घेतली आहे. डॉ.राजन हे मुंबई विद्यापीठ तसेच यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू असून उच्च तंत्रशिक्षण याविषयीचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी या मुलाखतीत एकूण शिक्षण व्यवस्थेवर, तिच्या बदललेल्या स्वरूपावर भाष्य करत विद्यार्थीवर्ग आता कशा विचारसरणीचा आहे विषयी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ.राजन यांनी सांगितल्याप्रमाणे संधी आणि वृत्ती यांचा मेळ बसतो तेव्हा विद्यार्थ्यांना ख-या अर्थाने आयुष्यात काय करायचे आहे याची उपरती होते. ब-याचदा ग्रामीणभागात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही संधी कुठे आहे याची नीट माहीती नसते. ज्या शिक्षकांना ही माहिती असते त्यांच्याकडे विद्यार्थ्यांना द्यायला खूप काही असते आणि म्हणूनच असे शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते असतात. आणि आताची एकूण परिस्थिती पाहता आता पालकांपेक्षा विद्यार्थ्यांकडे खूप चॉइस आहे. विद्यार्थी पारंपारिक विषयांकडे न वळता थिएटर, आर्ट्स शिवाय स्पोर्टस याकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे आता ब-याचदा विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टीकल लर्निंगची मागणी करण्यात येते. आपण सध्या सर्व्हिस ओरिएन्टेड आहोत, प्रोडक्ट ओरिएन्टेड नाही झालोत, जोपर्यंत आपण प्रोडक्ट ओरिएन्टेड होत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही, देश मोठा होण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. आता विद्यार्थी सायन्स, मेडिकल, अभियांत्रिकी याकडे न वळता इन्फ्लुएन्सरकडे जास्त आकर्षित होउन वेगळे पर्याय निवडताना दिसताहेत. त्यामुळे आता ९० टक्के मुलांना कौशल्य शिक्षणाची अधिक गरज आहे. AI मुळे खूप नोक-या धोक्यात येणार आहेत. त्यामुळे आता शिक्षणाला एक महत्त्वाचा मुद्दा करून आता सर्वांनी तिकडे लक्ष देण गरजेचं आहे. सध्या मतदाता जे कार्यकर्ता देखील आहेत यांची संख्या वाढलेली दिसत आहे, जे फार धोकादायक आहे, असे म्हणत डॉ.राजन यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विषयावर भाष्य करत लय भारीचे संपादक तुषार खरात यांच्याशी संवाद साधला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी