28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयकोरोना महामारीनंतर कराडमध्ये सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

कोरोना महामारीनंतर कराडमध्ये सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

टीम लय भारी

कराड : कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकार निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कालांतराने करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याने अखेर राज्य निवडणूक आयोगाने सहकार खात्याच्या प्रलंबित निवडणुकांचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला असून पहिल्या टप्प्यात कराड तालुक्यातील २५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे (Election program of co-operative societies announced in Karad).

शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ का बोलले जाते, जाणून घ्या

‘रंगकर्मींच्या कामी न येणारं सांस्कृतिक खाते तात्काळ बंद करावे’ अशी मागणी करत २७ सप्टेंबरला रंगकर्मींचे ‘पितृस्मृती आंदोलन’

सहकार प्राधिकरणाने मुदत संपलेल्या आणि करोनामुळे प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने एकूण सहा टप्प्यात निवडणूक कार्यक्रम होत आहे. पहिल्या टप्प्यात २०१९ मध्ये पात्र असलेल्या पण करोनामुळे निवडणुकीस स्थगिती देण्यात आलेल्या अशा सर्व प्रलंबित सहकारी संस्थाचा यात समावेश आहे (Election program Corona has ordered a general of pending co-operatives).

Election program of co-operative societie announced in Karad
अंतिम मतदार यादी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

कराड तालुक्यातील श्री कालिकादेवी सहकारी पतसंस्था, मंगलमूर्ती नागरी पतसंस्था, श्री महालक्ष्मी पतसंस्था, श्री लक्ष्मीदेवी ग्रामीण पतसंस्था, त्रिमूर्ती ग्रामीण पतसंस्था, स्वा.धनाजीराव मोहिते ग्रामीण, वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती, पार्वती अर्बन को ऑफ सोसायटी, श्री गोरक्षनाथ ग्रामीण पतसंस्था, गोदडगिरी ग्रामीण पतसंस्था, शेती उत्पन्न बाजार समिती सेवक पतसंस्था, क्रांती महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, कालवडे बेलवडे उपसाजलसिंचन संस्था, श्री गजानन को ऑफ हौसिंग सोसायटी, सदगुरू बाळूमामा नाविन्यपूर्ण सेवा संस्था, यशराज धान्य व भाजीपाला प्रतवारी व स्वच्छता सेवा संस्था, शेतकरी ग्रोसरी सप्लायर्स सहकारी संस्था, घटनेश्वर पाणी पुरवठा संस्था, सह्याद्री सहकारी पाणी पुरवठा संस्था, कृष्णाई मजूर सहकारी संस्था,आंबामाता मजूर सहकारी संस्था,श्री गुरुदेव दत्त मजूर संस्था,अजिंक्य सेवा पुरविणारा संस्था व सह्याद्री मजूर सहकारी संस्थांचा समावेश आहे.या संस्थांचा प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रारूप मतदार यादी २० सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाली आहे. यादीवर हरकती व आक्षेप नोंदवण्यासाठी २७ सप्टेंबर २०२१ दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर हरकतीवर निर्णय ४ ऑक्टोंबर २०२१ होणार आहे. अंतिम मतदार यादी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध करणेत येणार आहे.

फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यांना बाधा

Balasaheb Patil: Coop hsg societies with less than 250 members will be allowed to hold elections

दुसऱ्या टप्प्यात न्यायालयीन आदेशानुसार व प्राधिकृत अधिकारी यांची नियुक्ती असलेल्या सहकारी संस्था तर दि.१ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२० या कालावधीत तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या संस्था, चौथ्या टप्प्यात दि. १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० मधील पात्र संस्था, पाचव्या टप्प्यात दि. १ जुलै २०२० ते ३० सप्टेंबर २०२० व सहाव्या टप्प्यात दि. १ ऑक्टोंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमधील पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी