31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजन3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

बॉलीवुड मधील प्रसिद्ध अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले असून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अखिल मिश्रा यांनी अनेक चित्रपटांत अभिनय केला असून सुप्रसिद्ध 3 इडियट्स चित्रपटातील ‘लायब्ररियन दुबे’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली होती. अखिल मिश्रा यांच्या अकस्मित निधनाने बॉलीवूडला धक्का पोहोचला असून त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिल मिश्रा हे त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये काम करत असताना तोल जाऊन ते खाली पडले. त्यांचे वय 58 वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि जर्मन अभिनेत्री सुझान बरनेट या आहेत. सुझान यांना हैदराबाद मध्ये शूटिंग मध्ये व्यस्त असताना अखिल मिश्रा यांच्या निधनाची बातमी समजली. यानंतर, सुझान यांना मानसिक धक्का पोहोचला असून त्यांची अवस्था बिकट आहे. अखिल मिश्रा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून त्यांच्यावर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suzanne Bernert (@suzannebernert)

अखिल मिश्रा हे बहुरंगी अभिनेते होते. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये ताकतीच्या भूमिका वठवल्या होत्या. त्यांनी भवर, उतरण, उडान, भारत एक खोज, सीआयडी, हातीम, रजनी, श्रीमान श्रीमती यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांतही काम केले असून 3 इडियट्स, डॉन, गांधी, माय फादर, शिखर, हजारो ख्वाहीशे ऐसी, कमला की मौत, वेल डन अब्बा यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले होते.

हे ही वाचा 

चक्क धावत्या लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स, पहा विडियो..

अरिजितच्या आवाजातील ‘आशिकी 3’ चे गाणे लिक, सोशल मिडियावर झाले वायरल!

आता रणबीर, टायगर घालणार बॉक्सऑफिस वर धुमाकूळ, आगामी अ‍ॅक्शन चित्रपटांचे पोस्टर्स प्रदर्शित

3 इडियट्स मधील भूमिकेने मिळाली ओळख

अखिल मिश्रा यांनी सुपरहिट 3 इडियट्स चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. यात त्यांनी लायब्ररियन दुबे हे पत्र साकारले होते. लायब्ररियन दुबे हे पात्र प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते तर त्यातील अखिल यांचा “परमनंट हू सर” ह्या डायलॉगमूळे मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. आजही सोशल मीडियावर मीम स्वरूपात त्यांचा तो डायलॉग वायरल होत असतो. आमीर खान, आर. माधवन, शर्मन जोशी , बोमन इराणी यांसारख्या तगड्या अभिनेत्या समोर अखिल मिश्रा यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी