31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराष्ट्रीयहमालांचा संघर्ष समजून घेण्यासाठी राहुल गांधी बनले हमाल !

हमालांचा संघर्ष समजून घेण्यासाठी राहुल गांधी बनले हमाल !

भारत जोडो आंदोलनाच्या माध्यमातून  समाजातील सगळ्याच घटकांना जोडून घेण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. गुरुवारी सकाळी  ते  दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहचले आणि हमाल (कुली) मंडळींशी संवाद साधत, त्यांचे कपडे परिधान करून डोक्यावर सुटकेसही घेतली. राहुल गांधी यांचा हा कुलींच्या वेशातील फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी आज सकाळीच आनंद विहार रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या कुलींशी चर्चा केली. त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना होणारी मिळकत, त्यातून त्यांचं भागतं का आदी माहितीही त्यांनी घेतली. तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची विचारणाही त्यांनी केली. काही कुलींनी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचला आणि राहुल यांनी या कुलींना भेटण्याचा प्लानच तयार केला.

राहुल गांधी यांनी या कुलींशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यांच्यासोबत सेल्फीही काढला. त्यानंतर राहुल गांधी यांनी कुलींनी दिलेला त्यांचा गणवेश घातला. डोक्यावर सुटकेसही घेतली. काही काळ रेल्वे स्टेशनवर दिसले. राहुल गांधी यांचा हा कुलींच्या वेशातील फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

यावेळी एका कुलीने मीडियाशी संवाद साधताना प्रचंड आनंद व्यक्त केला. राहुल गांधी यांनी कुली आणि रिक्षा चालकांशी चर्चा केली याचा आम्हाला आनंद वाटतो. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्या सरकारच्या समोर मांडण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसेच या समस्या सोडवण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितल्याचंही या व्यक्तीने सांगितलं.

हे सुद्धा वाचा
3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू
आणि पाकिस्तानी कवियत्री रेहाना रुही यांची गझल लोकसभेत गाजली
व्हॉट्सॲपवर आले नवीन ‘अपडेट्स’ फीचर.. जाणून घ्या..

राहुल गांधी यांनी यापूर्वीही कुलींची भेट घेतली होती. गेल्या आठवड्यात उदयपूरला काँग्रेसचं चिंतन शिबीर होतं. तिकडे ते गेले होते. त्यावेळी कुली असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेतली होती. तसेही राहुल गांधी सामान्य लोकांना वरचेवर भेटत असतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. मध्यंतरी त्यांनी एका भाजी विक्रेत्याला त्याच्या पत्नीसह घरी बोलावलं होतं. त्यांच्यासोबत घरी जेवण करताना मनसोक्त गप्पाही मारल्या होत्या.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी