31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनचक्क धावत्या लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स, पहा विडियो..

चक्क धावत्या लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स, पहा विडियो..

हाडाचा कलाकार आपली कला दाखवायला नेहमीच सज्ज असतो. पूर्वी कला दाखवायला कलाकारांना विशिष्ट कार्यक्रमाची अथवा रंगमंचाची गरज असायची पण आता सोशल मिडियाच्या काळात मात्र कलाकार इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब द्वारे कलाकार घरबसल्या आपली कला दाखवत आहेत. पूर्वी कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन बघायला प्रेक्षकांना पैसे मोजायला लागायचे पण आता सोशल मिडियाच्या काळात लोक घरबसल्या अगदी मोफतपणे याचा आनंद घेऊ शकतात. या समाजमाध्यमतून अनेक कलाकार नावारूपास आले असून सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. परंतु, काही लोक अनेकदा या माध्यमांचा प्रसिद्धी साठी गैरवापर करत असताना दिसतात. अशातच आता मुंबई लोकल मधील एक डान्स विडिओ प्रचंड वायरल होत आहे.

मुंबईमधील लोकल ट्रेनमध्ये एक मुलगी धावत्या गाडीत बेली डान्स करतानाच विडिओ सध्या वायरल होत आहे. धावत्या गाडीत डान्स करताना टी दरवाजाच्या अगदी जवळ जाताना देखील दिसत आहे. या मुलीचे नाव आलिया मिर्झा असून ति मुंबईस्थित प्रोफेशनल डान्सर आहे. इन्स्टाग्राम वर तिचे 4 लाखांहून जास्त फॉलोवर्स असून तिच्या वायरल झालेल्या विडियो 1 लाखाहून अधिक लोकांनी पहिला आहे.

हे ही वाचा 

अरिजितच्या आवाजातील ‘आशिकी 3’ चे गाणे लिक, सोशल मिडियावर झाले वायरल!

आता रणबीर, टायगर घालणार बॉक्सऑफिस वर धुमाकूळ, आगामी अ‍ॅक्शन चित्रपटांचे पोस्टर्स प्रदर्शित

स्वरा भास्करचे बेबी बंप फोटोशुट झाले व्हायरल !

ह्या डान्समध्ये आलिया मिर्झा बेली डान्स करताना दिसते. पण, विडियोच्या कमेंट सेक्शनमध्ये मात्र लोक तीला ट्रोल करताना दिसत आहे. काही जणांना हा डान्स अश्लील वाटत असून अनेकांनी हा बेली डान्स नसल्याचे सांगितले आहे. काही लोकांनी कमेंट सेक्शन मध्ये चक्क रेल्वे पोलिस आणि मुंबई पोलिस यांना टॅग करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी