31 C
Mumbai
Saturday, November 25, 2023
घरजागतिकगाझा रुग्णालयातील 500 जीवांचे मारेकरी कोण?

गाझा रुग्णालयातील 500 जीवांचे मारेकरी कोण?

गाझा पट्टीतील एका रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यावरून वातावरण तापले आहे. या हल्ल्यात 500 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून यात अनेक बालके, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत असून जागतिक स्तरावर या हल्ल्याचा निषेध केला जातोय. युद्धातही काही नियम असतात. असे असताना रुग्णालयावर हल्ला का केला गेला? असा सवाल पॅलेस्टिनींचा आहे. यावरून पॅलेस्टिनी आणि इस्रायल यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पण हल्ला कुणी केला, याची जबाबदारी कुणीही घेत नाही. 7 ऑक्टोबर रोजी हमासकडून इस्रायलवर पहिला हल्ला करण्यात आला. तेव्हापासून सुरू झालेले युद्ध दिवसेंदिवस भडकत आहे.

मंगळवारी, (17 ऑक्टोबर) गाझा पट्टीतील अल-अहली अरब रुग्णालयावर हल्ला झाला. यात 500 हून अधिक पॅलेस्टिनी रुग्णांचा मृत्यूचा झाल्याचा दावा केला जात आहे. हे भयानक हत्यांकाड इस्रायलने घडवून आणल्याचा आरोप पॅलेस्टिनींनी केला आहे. तर हा हल्ला राक्षसी आहे आणि यात इस्रायलचा हात नाही, असा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी केला आहे. एवढेच नाही तर पॅलेस्टिनींचे इस्लामिक जिहाद रॉकेट मिसफायर होऊन हॉस्पिटल लक्ष्य झाल्याचा आरोप इस्रायलकडून केला जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींना दु:ख

वास्तविक युद्धामध्ये रुग्णालय, रुग्णांवर कधीही हल्ला करायचा नसतो. असे असताना थेट रुग्णालयावर हल्ला करून 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे जगभरात निषेध केला जातोय. या दुर्घटनेबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दु:ख व्यक्त केले आहे.


इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील युद्ध 12 दिवसांनंतरही थांबण्याचे नाव घेत नाही. उलट दिवसेंदिवस युद्ध भडकत आहेत. यातच रुग्णालयावरील हल्ल्यानंतर इस्रायलवर टीकेची झोड उठवण्यात येते. या पार्श्वभूमीवर इस्रायली सैन्याने पलेस्टिनींचे मिसफायर झालेल्या रॉकेट रुग्णालयावर कोसळल्याचा व्हिडीओ ट्वीटरवरून जारी केला आहे.


हे ही वाचा 

युद्ध का थांबत नाही?

१८०० नागरिकांच्या मृत्यूनंतरही हमास आक्रमक, रशियाची मध्यस्थीची तयारी

गाझामध्ये वीज, पाण्याशिवाय कसे जगतात लोक?

पॅलेस्टिनी राजदूतांचा रोख कुणावर?

या रुग्णालयामध्ये स्फोट घडण्यापूर्वी एक तास अगोदर इस्रायली सैन्याने इशारा दिला होता, असा गौप्यस्फोट पॅलेस्टाईनच्या जपानमधील राजदूतांनी केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात आतापर्यंत 2,778 पॅलेस्टिनींनी मृत्यू झाला आहे. तर इस्रायलच्या 1400 नागरिकांचा बळी गेल्याचा दावा केला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी