29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटेक्नॉलॉजीव्हॉट्सॲपवर आले नवीन 'अपडेट्स' फीचर.. जाणून घ्या..

व्हॉट्सॲपवर आले नवीन ‘अपडेट्स’ फीचर.. जाणून घ्या..

व्हॉट्सॲप युजर्स करिता एक महत्वाची बातमी असून मेटाने व्हॉट्सॲप साठी एक नवीन फीचर लॉंच केले आहे. या नव्या फीचरचे नाव ‘अपडेट्स’ असे असून हे एक ब्रॉडकास्ट चॅनेल सारखे काम करेल. नुकतेच भारतासह जगभरातील एकूण 180 देशांमध्ये हे फीचर लॉंच झाले आहे. याआधी असे फीचर टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळाले होते. आता व्हॉट्सॲपनेही आपल्या युजर्ससाठी हे फीचर आणले असून याद्वारे व्हॉट्सॲप युजर्सना व्हॉट्सॲपचा वापर करणे अजून सोयीचे ठरणार आहे.

काय आहे अपडेट्स टूल?

आतापर्यंत स्टेटस नाव असलेली टॅब आता अपडेट्स म्हणून ओळखली जाईल. ‘अपडेट्स’ हे एक ब्रॉडकास्ट चॅनेल सारखे काम करेल. या ब्रॉडकास्ट चॅनेलचा ऑप्शन युजर्सना या ‘अपडेट्स’ टॅब मधूनच मिळेल. इथे युजर्स जगभरातील आपल्या आवडत्या सेलिब्रिटी, खेळाडू, कलाकार, आणि संस्था यांना फॉलो करू शकतात. आणि त्याद्वारे संबंधित व्यक्ति अथवा संस्थेबद्दल अपडेट्स जाणून घेऊ शकतात. चॅनेल हे एक एकतर्फी ब्रॉडकास्ट टूल असून याद्वारे अ‍ॅडमिन टेक्स्ट, फोटोज, विडियोज, स्टीकर्स आणि पोल आपल्या फॉलोवर्स बरोबर शेयर करू शकतो.

तसेच अ‍ॅडमिनकडे त्यांच्या चॅनेलवरील स्क्रीनशॉट आणि फॉरवर्ड ब्लॉक करण्याचा पर्याय देखील असेल. फॉलोअर्सना चॅनेलमध्ये उत्तर देण्याची किंवा संदेश पाठवण्याची परवानगी नाही, परंतु ते कोणत्याही पोस्टवर इमोजीसह प्रतिक्रिया देऊ शकतात.

तुमचे स्वतःचे चॅनेल कसे तयार करावे?

यासाठी फक्त व्हॉट्सॲप अपडेट करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर युजर्सना अपडेट्स टॅबवर एक नवीन चॅनेल पर्याय दिसेल. व्हॉट्सॲप वरील कोणताही युजर चॅनेल पर्यायाच्या उजवीकडे असलेल्या “+” या चिन्हावर टॅप करून चॅनेल तयार करू शकतो. एकदा तुम्ही त्यावर टॅप केल्यानंतर, व्हॉट्सॲप तुम्हाला चॅनेल तयार करण्याचा पर्याय देईल. युजर्स त्यात नाव आणि इमेज देखील जोडू शकता. युजर्स किती चॅनेल तयार करू शकता यावर आतापर्यंत मेटाने मर्यादा घातलेली नाही.

हे ही वाचा 

चक्क धावत्या लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स, पहा विडियो..

डेक्कन ओडिसी ट्रेन २.० पुन्हा नव्या रूपात रूळावर

इथे आता २ हजारांची नोट चालणार नाही

अपडेट्स फीचर सुरक्षित आहे का?

चॅनेल अ‍ॅडमिनचा फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो फॉलोअर्सना दाखवला जाणार नाही. त्याचप्रमाणे, चॅनेलला फॉलो केल्याने फॉलोवरचे फोन नंबर अ‍ॅडमिन किंवा इतर फॉलोवर्सना दिसणार नाही. व्हॉट्सॲपने उघड केलेल्या तपशीलानुसार युजर्सने कोणाला फॉलो करायचे ही युजर्सची वैयक्तिक निवड असून ती खाजगी आहे. केवळ 30 दिवसांपर्यंत चॅनल इतिहास साठवून ठेवला जाईल कारण कंपनीचा असा विश्वास आहे की चॅनल मधील कंटेंट कायमस्वरूपी ठेवण्यात काही अर्थ नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी