29.9 C
Mumbai
Monday, August 28, 2023
घरमनोरंजनबांधकाम मजुराची पोरगी गाजवतेय लावणीचा महामंच

बांधकाम मजुराची पोरगी गाजवतेय लावणीचा महामंच

आकाश दडस, बिदाल: दहिवडी (ता माण ) येथील सामान्य कुटुंबातील कन्या कु. काजल शेखर गोसावी ही आपल्या मेहनत व जिद्दीच्या जीवावर आज लावणीच्या महामंचावर पोहचली आहे.सध्या कलर्स मराठी वाहिनी वर सुरू असणारा लोकप्रिय डान्स रियालिटी शो ‘ढोलकीच्या तालावर’ यामध्ये काजल आपल्या नृत्याने हा लावणीचा महामंच गाजवत आहे. काजल ही एक सामान्य कुटुंबातील आहे. वडील शेखर गोसावी हे बांधकाम क्षेत्रात मजुरी करतात. आई सौ. विजया गोसावी या गृहिणी असून शेळीपालन व्यवसाय करतात.काजल व आई – वडिलांची श्री स्वामी समर्थ यांच्यावर मोठी श्रद्धा आहे. शिक्षण दहिवडी येथील प.म शिंदे कन्या विद्यालय दहिवडी येथे झाले आहेत.

काजलच्या वडिलांना पहिल्यापासूनच लावणीची आवड आहे.काजल ही लहानपणापासूच जिद्दी होती. साधारण 10 ते 11 व्या वर्षीच तीने एका डान्स स्पर्धेत भाग घेऊन आपल्या टॅलेंटेची झलक दाखवली. आत्तापर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.काजलने आपला सर्व खर्च ही यामधून करून आपल्या वडिलांना हातभार लावायची.

यामध्ये वडिलांनी मोलाची साथ दिली. बाप- लेकीची ही जोडी आपल्या स्वप्नांना सोबत घेऊन प्रवास करताना कुठेही स्पर्धा असो , वडील आपल्या मोटारसायकलर घेऊन पोहचत होते. आई मैत्रीण म्हणून प्रोत्साहन द्यायच्या. यासाठी दोघांनीही कोणतीच कसर सोडली नाही. काजल उत्तम अभिनय ही करते आत्तापर्यंत लघुपट व अल्बम मध्ये ही काम केले आहे.हर्षा फिल्म्स प्रॉडक्शन च्या शॉर्ट फिल्म व ‘ सफर माणदेशी’ या ऐतिहासिक माहितीपटामध्ये काजल प्रमुख सूत्रसंचालन दिसली.

हे ही वाचा 

डिंपल क्वीन प्रीती झिंटानं जवळच्या व्यक्तीला गमावलं… इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट

ड्रीम गर्ल 2 ला तरुणाई भुलली; तीन दिवसांत कमावले 40 कोटी

सनी पाजीच्या गदर २ ने अक्षय कुमारचा ओएमजी २, रजनीकांतच्या जेलरला मागे टाकत कमावले इतके कोटी!

आई-बाबा दोघे ही गेले राहिल्या फक्‍त आठवणी… अजिंक्य देवची पोस्ट वायरल

आज काजलने ढोलकीच्या तलवार थिरकून आपल्या अदाकारीने सर्व प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पाडली आहे . सोबतच आपल्या मुलीला टीव्हीवर पाहण्याचे स्वप्न ही काजलने पूर्ण केले आहे. काजलचे सामाजिक,शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

यावर्षी ढोलकीच्या तालावर या बहुचर्चित डान्स रियालिटी शो सहा वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ढोलकीच्या तालावर हा एक अनोखा रियालिटी शो असून लावणी कलाकार “लावणी साम्राज्ञी” हे शीर्षक जिंकण्यासाठी स्पर्धा करणार आहेत. यावेळी, अभिनेत्री क्रांति रेडकर, दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि नृत्य दिग्दर्शक आशीष पाटील हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत तर अभिनेता अक्षय केळकर सूत्रसंचालन करताना दिसेल.

या शोचे २०११ ते २०१७ पर्यंत पाच सीझन प्रसारित झाले आहेत. शोच्या पहिल्या सीझनमध्ये स्नेहा वाघ, सोनाली खरे आणि इतर अभिनेत्रींनी स्पर्धक म्हणून भाग घेतला होता तर वैशाली जाधवने ट्रॉफी जिंकली. या शोने नंतर त्याचे पाच सीझन यशस्वीरित्या पूर्ण केले. दिपाली सय्यद, विश्वास पाटील, शकुंतला नगरकर आणि मानसी नाईक या शोच्या जज होत्या आणि शोचा अँकर अभिनेता सुबोध भावे होता.

शरद पवारांसमोर निलेश राणेंची औकात काय?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी