27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरमनोरंजनवाहतूक कोंडी टाळण्यासाठी 'या' चॉकलेट हिरोचा मेट्रो प्रवास

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘या’ चॉकलेट हिरोचा मेट्रो प्रवास

मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता बॉलिवूड कलाकारांनी मेट्रोच्या प्रवासाला पसंती दिली आहे. अभिनेता हृतिक रोशनने नुकताच मेट्रो प्रवास करत मुंबईकरांना सुखद धक्का दिला. वेळेची बचत करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रो प्रवास करणे निश्चितच लाभदायक ठरल्याचे हृतिकने सांगितले. मात्र अचानक हृतिकला मेट्रोत पाहून प्रवासी चांगलेच गोंधळले. हृतिक एका कोपऱ्यात शांतपणे उभे राहून आपल्या चाहत्यांचे हावभाव टिपत होता.हृतिकला कामाच्या ठिकाणी पोहोचायला वाहतूक कोंडीमुळे उशीर होत होता. त्यामुळे आपण मेट्रो प्रवासाचा पर्याय निवडल्याचे हृतिकने इंस्टाग्रामवर मेट्रो प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत सांगितले. ऑक्टोबर हिटमुळेही आता दिवसा रस्ते प्रवास करणे कठीणच होत असल्याची अप्रत्यक्षरित्या कबुलीही हृतिकने दिली.

हृतिकला आपल्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचायचे होते. हृतिक सध्या ‘फायटर’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हृतिकसोबत ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेत्री दीपिका पाडूकोण चित्रपटात महत्वाची भूमिका साकरत आहेत. या चित्रपटाच्या सेटवर पोहोचत हृतिकला महत्वाचा ऍक्शन सीन करायचा होता. मेट्रोतील प्रवासामुळे माझी पाठ व्यवस्थित आहे. मी आता आरामात ऍक्शन सीन करू शकतो, अशी माहिती देत हृतिकने इंस्टाग्रामवर आपल्या मेट्रोप्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केलेत.

हे सुद्धा वाचा
मंत्री अतुल सावेंच्या विभागाची कामगिरी न्यारी! कोट्यवधीच्या योजनांचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ
अनुष्का थेट स्टेडियममधून पाहणार ‘विराट’ खेळी
अजितदादा… २४ तास ऑन ड्युटी
हृतिकला अचानक पाहून प्रवाशांना काही मिनिटे आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. दुपारच्या प्रवासात मेट्रोमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र हृतिकने मेट्रो प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी दरवाज्याकडील कोपऱ्यात उभे राहणे पसंत केले. शाळकरी मुलांशी हृतिकने संवादही साधला. आपल्या इच्छित स्थानकावर मेट्रो लोकलबाहेर पडताच शाळकरी मुलांनी जोरजोराने हृतिकला हाक मारली. हृतिकनेही त्यांना बाय म्हटले. हा अविस्मरणीय क्षण मेट्रोतील प्रवासी टिपत होते.

याबाबतीतली माहिती हृतिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताच दीपिका पाडूकोणने पोस्टला लाईक केले. अनिल कपूर यांनी तू नम्र आणि सर्वोत्तम फायटर असल्याची प्रशंसा केली. तर युट्यूबर आशिष मनचंदानी यांनी आपल्या खास शैलीत विनोदी पोस्ट लिहिली. आम्हांला मेट्रो प्रवासात एवढे फुटेज मिळत नाही. हृतिक नुकताच फायटर चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी दीपिका पाडूकोणसह पॅरिस दौऱ्यावर होता. मुंबईत परतताच हृतिकने उर्वरित ऍक्शन सीनचे शूटिंग सुरु केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी