28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeजागतिकगाझामध्ये वीज, पाण्याशिवाय कसे जगतात लोक?

गाझामध्ये वीज, पाण्याशिवाय कसे जगतात लोक?

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसत नाही. हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलने आक्रमक पवित्रा घेऊन गाझा पट्टी नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला आहे. यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत असून अपरिमित वित्तीय हानी देखील होते आहे. हे कमी म्हणून की काय आता गाझा पट्टीत जगणेही अवघड झाले आहे. कारण एकाच वेळी नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातही पाण्याची समस्या आता भीषण झाली आहे. गाझामधील नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोकांचे हाल सुरू झालेत. हे युद्ध केव्हा संपेल आणि सारे काही पुन्हा केव्हा सुरळीत होईल, याकडे सामान्य लोक डोळे लावून बसले आहेत.

हमासने शनिवारी (७ ऑक्टोबर) सकाळी इस्रायलवर पहिला हल्ला केला. अवघ्या अर्ध्या तासात हमासकडून सुमारे पाच हजार रॉकेट इस्रायलवर सोडण्यात आले. मात्र, इस्रायलच्या डोम प्रणालीने यातील बहुतांश रॉकेट निकामी केले. तरीही इस्रायलची प्रचंड हानी झाली. सुरक्षायंत्रणा भेदून झालेल्या हल्ल्यामुळे इस्रायल गोंधळून गेला होता. नक्की काय झाले हे इस्रायलच्या सैन्यालाही काही तास कळले नाही. त्यामुळे हमासला प्रत्युत्तर देण्यास चार ते पाच तास लागले.

गाझामध्ये पाणीटंचाई, विजेविना हाल

 

आता युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. या युद्धामुळे गाझा पट्टीतील नागरिकांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. गाझा पट्ट्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. युद्धामुळे इंधनाअभावी जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडले आहेत. अनेक भागांचा पाणीपुरवठादेखील बंंद झाला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तोही अनियमित. त्यामुळे नागरिकांना मिळेत ते पाणी आणि अनेकदा दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे काही दिवसांनंतर लोकांना रोगराईचा सामना करावा लागणार आहे. हे कमी म्हणून की काय इंधनाअभावी वीजनिर्मिती प्रकल्पदेखील बंद आहे. त्यामुळे एकीकडे विजेविना हाल तर दुसरीकडे पाण्याचे दुर्भिष्य अशी स्थिती आहे.

उत्तर गाझा पट्ट्यातून स्थलांतर

इस्रायलने काल १० लाख नागरिकांना २४ तासांत उत्तर गाझा पट्टा सोडण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे गाझामधील नागरिकांचे उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर सुरू झाले आहे. त्याचवेळी गाझामध्ये अडकलेल्या अमेरिकी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या प्रयत्नांना यश आले आहे.

रफाह सीमा खुली

अमेरिकेने गाझा आणि इजिप्तशी चर्चा करून रफाह सीमा खुली केली आहे. त्यामुळे आठवड्यापासून गाझामध्ये अडकलेल्या नागरिकांचा बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लेबनॉनची तक्रार

लेबनॉन आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे इस्रायलची तक्रार करणार आहे. इस्रायलने लेबनॉनचे पत्रकार इसाम अब्दुल्लाह यांची जाणूनबुजून हत्या केल्याचा त्यांचा आरोप आहे. अब्दुल्लाह हे रॉयटरचे दक्षिण लेबनॉनमधील व्हिडीओग्राफर होते. विशेष म्हणजे ७ ऑक्टोबरला हमानसे इस्रायलवर हल्ला केला तेव्हा लेबनॉनमधूनही हल्ला झाल्याचा आरोप इस्रायलने केला होता. दरम्यान, वेस्ट बँकमधून इस्रायलने २८० पॅलेस्टिनींना अटक केली आहे. यातील १५७ थेट हमासशी संबंधित आहेत.

हे ही वाचा

१८०० नागरिकांच्या मृत्यूनंतरही हमास आक्रमक, रशियाची मध्यस्थीची तयारी

जरांगेंचे राजकीय बॉस शरद पवार, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप

जरांगेंचे फेसबुक पेज कोणी केले बंद?

ओआयसीची बुधवारी बैठक

इस्रायल-हमास यांच्यातील युद्धामुळे सौदी अरबियाने ओआयसी म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनची बैठक बोलावली आहे. गाझामधील लष्करी कारवाई, नागरिकांचे धोक्यात आलेले जीवन, त्यांची सुरक्षा आणि स्थैर्य यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात येईल. ५७ मुस्लीम देशाचा समावेश असलेल्या या संघटनेची बुधवारी जेद्दाहमध्ये बैठक होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी