30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनकुछ कुछ होता है फक्त २५ रुपयात!

कुछ कुछ होता है फक्त २५ रुपयात!

शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी अभिनीत करण जोहरचा कुछ कुछ होता है हा चित्रपट १९९८साली प्रदर्शित झाला होता. १६ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. ‘कुछ कुछ होता है’ बॉलीवूडच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी करण जोहरने १५ ऑक्टोबरला चित्रपटाचे मुंबईत तीन विशेष स्क्रीनिंग आयोजित केले आहे. या दिवशी ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट केवळ २५ रुपयांना उपलब्ध असेल. धर्मा प्रॉडक्शनने इंस्टाग्रामवर ही घोषणा केली आहे. वर्सोवा येथील पीव्हीआर सिनेमागृहात चित्रपट २५ रुपयात पाहायला मिळेल, अशी घोषणा होताच ऑनलाईन तिकीट विक्रीत सिनेमाचे सर्व तिकीट विकले गेले.

या सिनेमाने पदार्पणातच करण जोहर सर्वोत्तम दिग्दर्शक ठरला. सिनेमात शाहरुख आणि काजोलच्या महत्वाच्या भूमिका होत्या तर राणी मुखर्जी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. या चित्रपटाने १९९८ सालचे सर्व पुरस्कार पटकावले. शाहरुख खान बादशाह खान म्हणून नावारूपास आला. तर काजोल त्या काळातील यशस्वी अभिनेत्री ठरली.

करण जोहरने यावर्षी मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांच्या संवादादरम्यान सांगितले होते की, जेव्हा त्याने त्याच्या पहिल्या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुख खानशी संपर्क साधला तेव्हा त्याच्याकडे स्क्रिप्टही नव्हती. तो म्हणाला, “माझ्याकडे स्क्रिप्ट नव्हती आणि माझ्या मनात फक्त एक सीन होता, जो मी त्याला सांगितला. मी त्याला सांगितले की जर तुला हा एक सीन आवडला तर मी तुला संपूर्ण चित्रपट सांगेन, जे पूर्णपणे खोटे होते… तब्बू, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय यांनी मला नकार दिला, आदित्य चोप्राने शिफारस केल्यानंतर राणीच्या भूमिकेसाठी निवडायला काही महिने लागले.

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात राहुल खन्ना आणि त्याच्या आयुष्यातील दोन मुलींची कथा मांडण्यात आली आहे.
राहुल आणि अंजली शर्मा कॉलेजमध्ये चांगले मित्र असतात. राहुलच्या आयुष्यात टीनाचा प्रवेश होताच दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडते. राहुलवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अंजलीला कॉलेज सोडावे लागते. राहुलशी लग्न केल्यानंतर टीनाचा बाळंतपणात मृत्यू होतो. टीना आपल्या मुलीला वयाची आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर राहुल आणि टीनाला एकत्र आणायला सांगते. चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. चित्रपटाच्या आगळ्या वेगळ्या कथानकाने आजही टीव्हीवर ‘कुछ कुछ होता है’ आवडीने पाहिला जातो.

हे सुद्धा वाचा
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘या’ चॉकलेट हिरोचा मेट्रो प्रवास
जरांगेंचे राजकीय बॉस शरद पवार, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप
अनुष्का थेट स्टेडियममधून पाहणार ‘विराट’ खेळी

करण जोहरचा 1998 चा चित्रपट, हा एक क्लासिक कल्ट चित्रपट आणि यावर्षी, ‘कुछ कुछ होता है’ टीम चित्रपटाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त सज्ज आहे, कारण तो मूळत: 16 ऑक्टोबर 1998 रोजी प्रदर्शित झाला होता. या मैलाचा दगड लक्षात ठेवण्यासाठी, 15 ऑक्टोबर रोजी करण जोहर करत आहे. चाहते, आणि तिकीटांची किंमत फक्त 25 रुपये आहे. याआधी केजोने त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचे संकेतही दिले होते ज्याने प्रेक्षक कमालीचे उत्साहित झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी