27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजन'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' मराठी चित्रपट,संत मुक्ताबाईचा जीवनपट येणार रूपेरी पडद्यावर

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ मराठी चित्रपट,संत मुक्ताबाईचा जीवनपट येणार रूपेरी पडद्यावर

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा फार मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका आणि संत मुक्ताबाई यांचाही वाटा फार महत्त्वाचा आहे. या चोघांनाही विरक्ती, ज्ञान, भक्ती, मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते. आई वडिलांनंतर कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी ही मुक्ताबाईंवर पडली होती. हे चारही भावंडं एकत्रपणे नांदली परंतु यांची शिकवण ही जगाला कायम आहे. मुक्ताबाईंचे साधेपण, बुद्धी आणि भावंडांना सांभाळण्याची वृत्ती यामुळे त्यांचा परिचय हा सर्वांनाच आहे. स्त्री मुक्तीची जाणीवही त्यांचे आयुष्य आपल्याला करून देते. त्यांचे चरित्र हे आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित आता नवाकोरा चित्रपट हा प्रदर्शित होतो आहे. 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या भव्यदिव्य मराठी चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे.

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा फार मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका आणि संत मुक्ताबाई ( Sant Muktabai ) यांचाही वाटा फार महत्त्वाचा आहे. या चोघांनाही विरक्ती, ज्ञान, भक्ती, मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते. आई वडिलांनंतर कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी ही मुक्ताबाईंवर पडली होती. हे चारही भावंडं एकत्रपणे नांदली परंतु यांची शिकवण ही जगाला कायम आहे. मुक्ताबाईंचे साधेपण, बुद्धी आणि भावंडांना सांभाळण्याची वृत्ती यामुळे त्यांचा परिचय हा सर्वांनाच आहे. स्त्री मुक्तीची जाणीवही त्यांचे आयुष्य आपल्याला करून देते. त्यांचे चरित्र हे आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित आता नवाकोरा चित्रपट हा प्रदर्शित होतो आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'(Sant Dnyaneshwar’s Muktai) या भव्यदिव्य मराठी चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे.(Marathi film ‘Sant Dnyaneshwar’s Muktai’, life of Sant Muktabai to hit silver screen)

याची पहिली झलक ही नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. याआधी संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर आधारित आपण अनेक चित्रपट पाहिले आहेत. त्यातून संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांच्यातील नातंही फार विलक्षण होते. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'(Sant Dnyaneshwar’s Muktai) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातून नक्की कोणकोणते कलाकार दिसणार याची बरीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की, यातून लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची झलक पाहायला मिळते आहे.’संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'(Sant Dnyaneshwar’s Muktai) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातून नक्की कोणकोणते कलाकार दिसणार याची बरीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की, यातून लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची झलक पाहायला मिळते आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताच्या भूमिकेत ईश्मिता जोशी दिसत आहेत. मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचे नाते हे विलक्षण होते. मुक्ताई ज्ञानेश्वरांना आपली आईच मानायचे. त्यातून त्या कधी बहीण, कधी शिष्या तर कधी गुरू बनत त्यांच्यासोबत कायमच असायच्या. त्यातून विविध गोष्टी त्यांनी मुक्ताईंकडून आत्मसाद केले आहेत. अनेक कठीण प्रसंगात त्यांनी संत ज्ञानेश्वरांना उपदेशही दिला आहे. त्यांचे श्रेष्ठपण किती हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. त्यामुळे आता ही कथा आपल्याला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अनेक कठीण प्रसंगात त्यांनी संत ज्ञानेश्वरांना उपदेशही दिला आहे. त्यांचे श्रेष्ठपण किती हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. त्यामुळे आता ही कथा आपल्याला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी