31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमनोरंजन‘मिस टुरिझम युनिव्हर्स 2021’ विजेतीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

‘मिस टुरिझम युनिव्हर्स 2021’ विजेतीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

टीम लय भारी

मुंबई : ‘मिस टुरिझम युनिव्हर्स 2021’ स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्राच्या सुकन्या श्रीया परब हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. श्रिया ही मिस युनिव्हर्स टुरिझम २०२१ ची विजेती बनली आहे (‘Miss Tourism Universe 2021’ met the CM Uddhav Thackeray).

भेटीदरम्यान श्रिया परब हिचे मुख्यमंत्र्यांनी स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा ही दिल्या. त्याच वेळी श्रिया हिने महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी शासनास सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या वेळी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी केली बोगस प्राध्यापकाची नियुक्ती

रोहिणी शेलार यांचा विजय निश्चित : राज राजापूरकर

आशियातील २२ देशांच्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. ‘मिस टुरिझम युनिव्हर्स 2021’ हा किताब जिंकून तिने सर्वच भारतीयांची मान उंचावली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे.

‘मिस टुरिझम युनिव्हर्स 2021’ विजेतीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सदाभाऊ खोतांच्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने मागण्या

Mumbai: ED arrests close aide of Shiv Sena MP in money-laundering case

तिने तिच्या या यशाचे श्रेय तिचे पालक, तिचे मार्गदर्शक, प्रशिक्षक ऋषिकेश मिराजकर यांना दिले आहे. श्रिया परब ही सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील आहे. तिच्या या यशाने तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी